जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी लावलेल्या १००टक्केच्या फलकावरून संपूर्ण तालुक्यात तणाव !

Published on -

अहिल्यानगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारुन झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सकल हिंदू समाजात चीड निर्माण झाली असून त्या अनुषंगाने शहरात दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या किमान हिंदूंनी नाव विचारून खरेदी करा असे आवाहन करणारा फलक लावण्यात आला होता.

बॅनरवर शंभर टक्के आर्थिक बहिष्कार व सकल हिंदू समाज पाथर्डी तालुका असा उल्लेख करण्यात आला . सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी हे बॅनर शहरातील मुख्य चौकात लावले होते. आर्थिक बहिष्कार टाकण्याचे आवाहनामुळे अल्पसंख्याक व्यावसायिकांत अस्वस्थता पसरली. दुपारी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बॅनरला परवानगी नसल्याचे कारण सांगत हे बॅनर हटविल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना जाब विचारला. शहरात अनेक अनधिकृत बॅनर विनापरवानगीचे असताना हेच बॅनर का काढण्यात आले असा सवाल करण्यात आला. मागील वर्षभरात किती जणांनी नगरपालिकेकडे बॅनरची परवानगी घेतली.

नगरपरिषदेला किती महसूल गोळा झाला. याचाही जाब विचारत हाच बॅनर हटविल्याचे कारण विचारले. यावेळी नगरपरिषदेने विनापरवाना बॅनर असल्याचे व या बॅनरमुळे समाजात तेढ निर्माण होईल यामुळे हे बॅनर हटविल्याचे सांगितले.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे गत २२ एप्रिल रोजी भयंकर अतिरेकी हल्ला झाला. त्यात महाराष्ट्राच्या ६ जणांसह एकूण २६ पर्यटकांचा बळी गेला. या हल्ल्यातील काही प्रत्यक्षदर्शींनी अतिरेक्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्याचा दावा केला आहे.

यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. माजी मंत्री नितेश राणे यांनीही काही दिवसांपूर्वी दापोली येथे आर्थिक बहिष्काराचे आवाहन केले होते. शहरातील मुख्य नाईक चौक, बाजारतळ आदी ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले होते. ४०० वर्षांपूर्वी आपल्या शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारले, आणि आजही २७ लोकांना धर्म विचारूनच मारले. काहीच बदलले नाही…

म्हणून तुम्ही किमान नाव विचारूनच खरेदी करा. १००% आर्थिक बहिष्कार असे या पोस्टरवर पहलगाम हल्ल्याचा दाखला देत नमूद करण्यात आले आहे. या मजकुराच्या खाली सकल हिंदू समाज असा उल्लेख करण्यात आला आहे. हे पोस्टर शहरातील मुख्य चौकात लावले होते .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News