एक असाही विवाह : मंदिरातील लग्न वधुवरासह वऱ्हाडी मंडळी पोहोचली थेट पोलिस ठाण्यात

Published on -

अहिल्यानगर : अनेकदा मुलींना दिलेल्या स्वातंत्र्याचा असा गैरफायदा देखील घेतला जातो. शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईल हातात आला. त्याचा वापर इंन्स्टाग्रामवर थेट प्रेमासाठीच झाला.अन शिक्षण अधुरेच राहीले.

आई-वडीलांचा विश्वास तोडला. जी मुलगी आई-वडीलांची होवु शकली नाही ती आता इतर कोणाची कशी होवु शकेल. असा सवाल प्रत्येकालाच पडला आहे , कारणही तसेच घडले आहे. एक मुलगी अकरावीत शिकत होती.

त्या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन् ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तो आला अन् थेट पळवुन घेवुन गेला. मात्र मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. पोलिस तपास सुरु झाला. तुम्ही या तुमचे लग्न लावुन देतो असा बनाव पोलिसांनी रचला. ते मात्र जोरदार लग्नाच्या तयारीने आले.

पोलिसांनी आधीच सापळा लावलेला होता. त्यामुळे नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी पोलिसांनी ताब्यात घेतले. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावातील डोंगरावर ही अगदी सिनेमाला लाजवेल अशी घटना घडली. या भागातील एका गावातील मुलगी अकरावीच्या वर्गात शिकत होती.

अल्पवयीन मुलीची आणि संकेत राम गोंडकर (रा.केरुळ ,ता.आष्टी जि.बीड) यांची इंन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळख प्रेमात रुंपातरीत झाली. मग ठरले. ९ एप्रिल २०२५ रोजी संकेत गोंडकर त्याची स्विप्ट गाडी घेवुन आला. मुलगी घरातुन आई समोर पळाली व गाडीत बसली.

आईने पाथर्डी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस तपास करीत होते. पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना विनंती केली की मुलगा हजर करा. मात्र त्यांनी काही ऐकले नाही. अखेर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पाथर्डी पोलिसांनी सापळा लावला.

फिर्यादीला आरोपींशी संपर्क करायला लावुन तुम्ही या तुमचे लग्न आम्ही लावुन देतो असे सांगतिले. मग काय नवरदेव त्याचा भाऊ व गावातील इतर प्रतिष्ठीत देखील लग्नासाठी मंगळवारी दुपारी हजर झाले. लग्नाचे ठिकाण देखील डोंगरात दत्त मंदीरात ठरले होते.

नवरदेव व नवरी आले तसेच पोलिसांनी सर्वजण ताब्यात घेतले. मग काय धावपळीत असे घडले की, नवरदेवाचा टोप थेट पोलिस ठाण्यात साहेबांच्या टेबलवर तर नवरीच्या मंडुळ्या पोलिस ठाण्याच्या आवारात पोहोचल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News