महिला कंडक्टरनेच प्रवाशाला केली मारहाण : पोलिसात गुन्हा दाखल

Published on -

अहिल्यानागर : राज्य परिवहन महामंडळच्या एसटी बसमध्ये प्रवासात झोपेत असतांना झोपेतुन उठवुन तुमच्याकडे तिकीट आहे का, अशी विचारणा करत डोक्याच्या डाव्या बाजुस चापटीने मारहाण केली असल्याची घटना घडली असुन,

याबाबत गोरक्षनाथ देविदास दातीर यांच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात वाहक राधाबाई डी.आबुज यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गोरक्षनाथ देवीदास दातीर (रा. दातीरवाडी ता.पाथर्डी) हे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करत आसतांना झोपेत होते एसटी बस माळीबाभुळगाव शिवारात आली.

असता सदर एसटी बसच्या वाहक राधाबाई डी.आबुज यांनी दातीर यांना झोपेतून उठवुन तुमच्याकडे तिकीट आहे का अशी विचारणा केली व काही एक कारण नसतांना दातीर यांच्या डोक्याच्या डावा बाजुस चापटीने मारहाण केली असल्याची तक्रार दिली आहे.

याबाबत दातीर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात वाहक राधाबाई आबुज यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो. हे.कॉ. रामदास सोनवणे हे करत आहेत. वाहक राधाबाई आबुज यांनी देखील दातीर बंधुवर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News