Gold Price Today : आज 30 एप्रिल 2025 अर्थातच अक्षयतृतीयाचा मोठा सण. खरंतर, अक्षय तृतीयेच्या सणाला सोने आणि चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. हिंदू सनातन धर्मात या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
अशा परिस्थितीत जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजेच आज सोने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात जाणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

कारण की आज आपण 30 एप्रिल 2025 रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. खरे तर सात आठ दिवसापूर्वी सोन्याच्या किमतीने एक नवा रेकॉर्ड स्थापित केला होता. 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत एका लाखाच्या वर पोहोचली होती.
या दिवशी 24 कॅरेट सोन्याची किंमत एक लाख एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आणि त्यामुळे सोन्याच्या किमती याहून अधिक वाढणार की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मात्र सोन्याच्या किमतीत झालेली ही दरवाढ जास्त काळ टिकू शकली नाही कारण की एका दिवसातच सोन्याची किंमत 3000 रुपयांनी घसरली.
म्हणजेच 23 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत 98 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली आली. 24 एप्रिल ला ही किंमत 98 हजार 240 रुपयांपर्यंत कमी झाली. यानंतर मात्र, सातत्याने सोन्याच्या किमतीत घसरनच होत राहीली. सोन्याची किंमत 28 एप्रिल 2025 पर्यंत सातत्याने घसरत राहिली आणि काल अर्थातच 29 एप्रिल 2025 ला सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झाली.
काल सोन्याची किंमत 440 रुपयांनी वाढली. सोन्याची किमत काल 97 हजार 970 रुपये एवढी नमूद करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे आदर्श तृतीयाच्या दिवशी देखील सोन्याच्या किमतीत वाढीचा ट्रेंड पाहायला मिळतोय. आता आपण राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा किमतीचा आढावा घेणार आहोत.
मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, ठाणे : महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर सोलापूर कोल्हापूर जळगाव ठाणे या प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती एकसमान असतात. मिळालेल्या माहितीनुसार, आज अक्षय तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रातील या संबंधित प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,810 रुपये प्रति दहा ग्रॅम तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत 73490 रुपये प्रति दहा ग्राम एवढी राहिली आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : भिवंडी, लातूर, वसई विरार आणि नाशिक या शहरांमध्ये सुद्धा सोन्याच्या किमती एकसमान असतात, मात्र वर नमूद केलेल्या शहरांपेक्षा भिन्न असतात. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रातील या संबंधित प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 10 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,840 रुपये प्रति दहा ग्रॅम तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत 73,520 रुपये प्रति दहा ग्राम एवढी राहिली आहे.