8th Pay Commission : 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. यानंतर देशात सर्वत्र नव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू झाल्यात. खरंतर सध्याचा सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त होणार आहे.
वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होता नाही. सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू आहे अशा परिस्थितीत नवा आठवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे.

दरम्यान याच नव्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरेतर, सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या दिशेने काम सुरू केले आहे, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या अनुषंगाने नुकतेच एक मोठे पाऊल उचलले गेले आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल 2025 रोजी अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने (DoE) दोन परिपत्रके जारी केली होती, ज्याद्वारे 42 पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या नव्या वेतन आयोगामध्ये अध्यक्ष आणि इतर दोन महत्त्वाच्या सदस्यांव्यतिरिक्त, त्यात सल्लागार आणि इतर कर्मचारी देखील असतील.
दरम्यान, जर सर्व काही वेळापत्रकानुसार झाले तर, आठवा वेतन आयोग पुढील महिन्याच्या अखेरीस आपले काम सुरू करेल अशी खात्रीलायक बातमी सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, आयोगाच्या अध्यक्ष आणि दोन प्रमुख सदस्यांची नावे जवळजवळ फायनल झाली आहेत. मात्र आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याचे नाव अजून पर्यंत समोर आलेले नाही.
पण, या नियुक्त्यांची लवकरच औपचारिक घोषणा केली जाणार आहे आणि त्यावेळी साहजिकच आयोगाच्या अध्यक्षांचे नाव सुद्धा समोर येणार आहे. तसेच उर्वरित 40 पदांसाठीच्या नियुक्त्या वेगवेगळ्या सरकारी विभागांमधून प्रतिनियुक्तीद्वारे केल्या जाणार आहेत.
म्हणजेच पुढील महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती होईल आणि त्यानंतर आयोगाकडून प्रत्यक्षात काम सुरू होईल असे चित्र दिसत आहे. मात्र असे असले तरी अद्याप केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाची औपचारिक स्थापना किंवा त्याच्या संदर्भ अटी (ToR) जाहीर केलेल्या नाहीत.
मात्र अलीकडे जारी करण्यात आलेल्या दोन महत्वाच्या परिपत्रकांवरून आणि अंतर्गत तयारीवरून असे दिसून येते की सरकार या दिशेने वेगाने काम करत आहे. म्हणून येत्या काही महिन्यांत आयोग आपले काम सुरू करेल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यामुळे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाकडे मोठे बारीक लक्ष ठेवून आहेत.