Viral Video : सध्याचे युग हे मोबाईल स्मार्टफोन, टीव्ही आणि सोशल मीडियाचे. सोशल मीडियामुळे हे जग फार छोटे झाला आहे. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली घटना सोशल मीडियामुळे अगदी काही क्षणात आपल्याला समजते.
दरम्यान या सोशल मीडियामध्ये अनेक मनोरंजन पर गोष्टी सुद्धा व्हायरल होतात. बातम्या, डान्स, कॉमेडी, गाणे, माहितीपर व्हिडिओज समवेत इतरही अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतात. दरम्यान सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

खरे तर सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही आणि याचीच प्रचिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओ मधून येते. सध्या एक्स (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉलेज कॅम्पस मधील तरुणींचा हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत असे दिसते की, एका कॉलेज कॅम्पस मध्ये काही तरुणींमध्ये जोरदार बाचाबाची सुरू आहे.
बाचाबाची सुरू असतानाच तरुणींमधील हा वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकींना अक्षरशः फिल्मी स्टाईल हाणामारी करत एकमेकींच्या झिंज्या ओढल्या आहेत. तरुणी एकमेकांना रस्त्यावर खेचून, लाथाबुक्क्यांनी मारहाण सुद्धा करताना दिसत आहेत. यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये अवघ्या काही तासातच मोठ्या प्रमाणात वायरल झालेला आहे.
या घटनेचा व्हिडिओ पाहता अनेकांना धक्का बसला आहे अन अनेकांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त तरुणींना सल्ला दिलाय. दरम्यान, आता आपण हा व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका कुठला आहे? तसेच तरुणींमध्ये एवढी तुंबळ हाणामारी का झाली? याची माहिती पाहूयात.
कुठला आहे हा व्हिडीओ?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ दिल्ली युनिव्हर्सिटी मधील कॅम्पसचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान या व्हायरल झालेल्या व्हिडिओ तरुणींचा एक गट एकत्र आलेला दिसत असून काही तरुणी मोठ्या आवाजात आरडाओरडा सुद्धा करत आहेत.
सुरुवातीला काहीतरी गोष्टीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळतो. सुरुवातीला फक्त बाचाबाची असते मात्र नंतर वाद शिगेला पोहोचतो आणि हाणामारी सुरू होते. दरम्यान हाणामारी सुरू झाल्यानंतर काही तरुणी वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना सुद्धा दिसत आहे मात्र तरुणी कोणाचेच ऐकत नाहीत आणि एकमेकांच्या झिंज्या उपटतात.
यामुळे सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणींची ही सिनेमा स्टाईल हाणामारी प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओला शेअर केले आहे. हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम तसेच एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत असून अनेक जण या व्हिडिओला लाईक करत आहेत.
आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून कित्येकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील Ghar Ke Kalesh या अकाउंट वरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. दरम्यान हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तो व्हायरल झाला.
या व्हिडिओवर अनेकांच्या माध्यमातून कमेंट्स चा वर्षाव होतोय. कमेंट करून अनेकांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत तरुणींचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर काही नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट सुद्धा केलेले आहेत.
एक्स वर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओवर एका यूजरने त्यांच्या घरच्यापर्यंत हा व्हिडिओ जातो का? अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने नक्कीच खूप मोठं कारण असेल हाणामारीचे अशी कमेंट केली असून आतापर्यंत या व्हिडिओज वर अनेकांनी आपापले मत मांडले आहे.