पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील 4 Railway स्थानकावर थांबणार

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. तुम्हीही पुण्यात वास्तव्याला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक कामाची राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे रेल्वे स्थानकावरून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी राज्यातील चार महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे.

Published on -

Pune Railway : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आता रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज चालवले जाणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते जोधपुर दरम्यान आता दररोज रेल्वे गाडी धावणार आहे. पुणे-जोधपूर-पुणे दैनंदिन रेल्वेसेवेला रेल्वे मंत्रालयाकडून नुकतीच मान्यता देण्यात आली असून यामुळे पुणे ते जोधपुर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर पुण्यातून राजस्थानला आणि राजस्थानातून पुण्याला येणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे.

यामुळे पुणे ते जोधपुर अशी रेल्वे सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी होती. त्यानुसार पुणे ते जोधपूर अशी साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू देखील झाली मात्र या मार्गावर दररोज प्रवाशांचे प्रचंड गर्दी होते आणि म्हणूनच पुणे ते जोधपूर हे साप्ताहिक रेल्वे सेवा दैनंदिन रेल्वे सेवेत परावर्तित करून प्रवाशांना दिलासा द्यायला गेला पाहिजे अशी मागणी सकल राजस्थान समाजाच्या माध्यमातून करण्यात आली होती.

दरम्यान आता राजस्थान समाजाच्या याच मागणीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून पुणे जोधपूर दैनंदिन रेल्वे सेवेला मंजुरी देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जोधपुर दैनंदिन रेल्वे सेवेला मंजुरी मिळाली असल्याची मोठी घोषणा स्वतः केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

पुण्यातील हडपसर ते जोधपुर दरम्यान ही रेल्वे सेवा सुरू होणार असून रेल्वे क्रमांक 20495 व 20496 या दोन रेल्वेगाड्या नियमीतपणे हडपसरवरून धावणार अशी माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे जिल्हयातील संपूर्ण राजस्थानी समाजातर्फे मागील अनेक वर्षापासुन पुणे जोधपुर दैनंदिन रेल्वे सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती.

राजस्थानी समाजाच्या याच मागणीच्या अनुषंगाने राजस्थानमधील खासदार पी. पी. चौधरी, गजेंद्रसिंग शेखावत, पुण्याचे खासदार आणि केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर अनेक लोकप्रतिनिधींनी आणि मान्यवरांनी पुणे जोधपुर दैनंदिन रेल्वे सेवेसाठी प्रयत्न केलेत.

दरम्यान आता या लोकप्रतिनिधींचा आणि सकल राजस्थानी समाजाचा पाठपुरावा यशस्वी झाला आहे. पुणे जोधपुर पुणे दैनंदिन रेल्वे सेवा आता लवकरच सुरू होणार असून यासाठीची बुकिंग येत्या काही दिवसांनी ओपन होईल अशी माहिती रेल्वे कडून हाती आली आहे. पुणे ते जोधपुर दरम्यान सुरू केल्या जाणाऱ्या

या दैनंदिन रेल्वे सेवेला राज्यातील वसई रस्ता, कल्याण, लोणावळा आणि चिंचवड या चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर राहणार आहे. त्यामुळे या स्थानकावरून राजस्थानला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार असल्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe