7th Pay Commission : जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यानंतर मार्च महिन्यात मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला.
केंद्र सरकारने मागील महिन्यात 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) व निवृत्तिवेतनधारकांचा महागाई सवलत भत्ता (DR) यामध्ये 2 टक्के वाढ जाहीर केली.

आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 53% दराने महागाई भत्ता आणि महागाई सवलत भत्त्याचा लाभ मिळत होता. मात्र यामध्ये गेल्या महिन्यात दोन टक्क्यांची वाढ करण्याचा मोठा निर्णय झाल्यानंतर हा महागाई भत्ता 55 टक्क्यांवर पोहोचला.
वाढ 1 जानेवारी 2025 पासून…
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली. दरम्यान केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% झाल्यानंतर आता देशातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जातोय.
राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, तामिळनाडू या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून सुधारित करण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
अशातच आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नव अपडेट हाती आल आहे. सध्या देशात सुमारे 48.66 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 66.55 लाख निवृत्तिवेतनधारक आहेत आणि या साऱ्यांना आता लवकरच पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. दरम्यान, आज आपण पुढील महागाई भत्ता वाढ नेमकी कधी होणार आणि महागाई भत्ता कितीने वाढणार याबाबतची माहिती पाहणार आहोत.
पुढील महागाई भत्ता वाढ किती टक्क्याची असणार?
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांशी बोलताना असे सांगितले की, “महागाई वाढीचा फटका लक्षात घेता सरकारने जानेवारी 2025 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाचे म्हणजे याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात झाला असल्याने जानेवारी ते मार्च या कालावधीसाठीची थकबाकीही त्यांना अदा करण्यात आली आहे. खरे तर केंद्र सरकार दरवर्षी दोनदा DA/DR वाढवते. पहिल्यांदा मार्च महिन्यात आणि दुसऱ्यांदा सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जातो.
मात्र ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून लागू केली जाते. यावर्षी जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढत झाली आहे. आता जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता वाढ बाकी असून मीडिया रिपोर्ट्स मध्ये पुढील DA/DR वाढ 3% इतकी असण्याची शक्यता असल्याचा अंदाज समोर आला आहे.
महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार
म्हणजेच जुलै 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजेच महागाई भत्ता 58 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. पण पुढील महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय हा ऑगस्ट ते सप्टेंबर यादरम्यान घेतला जाणार आहे. पुढील महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात 540 रुपये आणि पेन्शनमध्ये 270 रुपयांची वाढ होणार अशी माहिती देण्यात आली आहे.
हे पण वाचा :
- सातवा वेतन आयोगातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू ! जीआर पण निघाला, वाचा…
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PF कट होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये ‘इतकी’ वाढ होणार
- आठव्या वेतन आयोगाबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ! आयोगाच्या अध्यक्षांचे नाव झाले फायनल, पॅनलची स्थापना कधी ?
- मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि सण अग्रीम वाढला
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘या’ 16 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढला, किती वाढला डीए