Personality Test : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. आपल्या सभोवताली असणाऱ्या प्रत्येक माणसाचा स्वभाव आणि व्यक्तीमत्व हे इतरांपेक्षा वेगळे असते. स्वभावावरूनच माणसाचे व्यक्तिमत्व समजते.
माणूस चांगला आहे की वाईट हे आपण त्याच्या वागण्यावरून ठरवत असतो. अनेकदा आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या वागणुकीवरून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

पण, प्रत्येकच वेळी ही टेक्निक कामी येत नाही. अनेकांचा स्वभाव त्याच्या वागणुकीवरून झळकत नाही. आपण एखाद्याला फारच वाईट समजतो मात्र प्रत्यक्षात तो वाईटच असतो असे नाही. तसेच आपण काही लोकांच्या वागण्यावरून त्यांना फारच चांगले समजतो पण ते चांगलेच असतील असेही नाही.
म्हणजे पहिल्या अंदाजात कोणाचाही स्वभाव ओळखण्यात आपल्याकडून चूक होण्याची शक्यता असते. अशा वेळी, मग आपल्या मनात काही लोकांची इमेज फारच चांगली आणि काही लोकांची इमेज फारच वाईट बनते.
म्हणूनच आज आपण शारीरिक वैशिष्ट्यांवरून, म्हणजेच व्यक्तीच्या शरीरावरून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व कसे असेल हे ओळखण्याची पद्धत सांगणार आहोत.
असं म्हणतात की व्यक्तीच्या हाताचा पंजा सुद्धा त्याचे व्यक्तिमत्व आणि स्वभावाचे बखान करत असतो. दरम्यान आज आपण व्यक्तीच्या हाताच्या पंजावरून, हाताच्या बोटांवरून त्याचा स्वभाव कसा ओळखायचा याची माहिती जाणून घेणार आहोत.
हातांच्या बोटावरून व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखायचा?
अनामिका आणि तर्जनीची लांबी सारखी असणे : काही लोकांची अनामिका आणि तर्जनी एकसमान उंचीची असते आणि अशा लोकांच्या बाबतही काही रंजक गोष्टी सांगितल्या जातात.
असं म्हणतात की ज्या व्यक्तींची अनामिका व तर्जनी समान उंचीची असते, ते लोक फारच मेहनती असतात. या लोकांच्या स्वभाव गुणाबाबत बोलायचं झालं तर हे लोक सौम्य, स्थिर, मेहनती आणि सकारात्मक वृत्तीचे असतात.
यामुळे समाजात अशा लोकांचे विशेष वजन असते. आपल्या मेहनतीच्या जोरावर हे लोक समाजात एक वेगळं स्थान निर्माण करतात आणि यांना समाजात मोठा मान सन्मान मिळतो.
अंगठा सामान्य पेक्षा लांब असणे : आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक लोकांचा अंगठा हा सामान्य पेक्षा लांब असतो. असं म्हणतात की असे लोक हे नेतृत्वगुणांनी परिपूर्ण असतात. नेतृत्वगुण असलेले, आत्मविश्वासपूर्ण आणि निर्णयक्षम लोक म्हणून या लोकांना ओळखलं जात.
अनामिका तर्जनीपेक्षा मोठी असणे : आपल्या आजूबाजूला असणाऱ्या काही लोकांची अनामिका तर्जनी पेक्षा मोठी असते. जर तुमच्याही आजूबाजूला असे लोक असतील तर समजून जा की हे लोक इतर व्यक्तींना आपल्याकडे सहज आकर्षित करतात.
या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि यामुळेच या लोकांची फ्रेंड सर्कल सुद्धा फार मोठी असते. हे लोक सामाजिक, स्वावलंबी आणि महत्वाकांक्षी असतात.
अनामिका तर्जनीपेक्षा लहान असणे : तुमच्या आजूबाजूला असेही काही लोक असतील ज्यांची अनामिका तर्जनी पेक्षा लहान आहे. असे म्हणतात की ज्या लोकांची अनामिका तर्जनी पेक्षा लहान असते असे लोक फारच सतर्क असतात.
दक्ष असण्यासोबतच हे लोक आपल्या आयुष्यात धाडसी निर्णय घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. धाडसी आणि समतोल जीवन जगणारे लोक म्हणून हे लोक ओळखले जातात.