Bank Locker Rule : देशातील बँक खातेधारकांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरंतर देशातील बँकांच्या माध्यमातून आपल्या खातेधारकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
बँका खातेधारकांना बँकेकडून लॉकरची सुविधा देखील उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान जर तुम्हीही बँक लॉकरची सुविधा घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे.

जाणकार लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या मध्यवर्ती बँक अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून बँक लॉकरच्या संदर्भातील नियमांमध्ये नुकताच मोठा बदल करण्यात आला आहे.
यानुसार, आता ज्या ग्राहकांनी 31 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी बँकेसोबत लॉकरसाठी करार केला आहे, त्यांना नवीन नियमांनुसार सुधारित करारावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. तसेच हा सुधारित करार संबंधित ग्राहकाला बँकेला पाठवावा लागेल. दरम्यान लॉकर घेण्यापूर्वी बँक ग्राहकांनी नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे राहणार आहे.
बँक लॉकर घेण्याआधी या गोष्टी जाणून घ्या
लॉकर घेण्याआधी ही कागदपत्रे रेडी ठेवा : कोणत्याही बँकेकडून लॉकर घ्यायचे असेल तर ग्राहकांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. समजा तुम्ही एखाद्या बँकेत लॉकर घेणार आहात आणि त्या बँकेत तुमच्या अकाउंट नसेल तर अशावेळी बँक तुम्हाला अकाउंट ओपन करण्यास सांगेल.
यावेळी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा आवश्यक राहणार आहे. याशिवाय, पॅन कार्ड देखील आवश्यक असेल. पत्ता पुरावा म्हणून तुम्ही तुमचा आधारचा वापर करु शकता.
बँकेची निवड काळजीपूर्वक करा : देशातील जवळपास सर्वच बँका ग्राहकांना बँका लॉकरची सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र लॉकर साठी कोणतीही बँक निवडण्याआधी ग्राहकांनी योग्य माहिती गोळा करणे आवश्यक आहे.
चांगली सर्विस देणारी बँक लॉकर साठी निवडावी. महत्त्वाची बाब म्हणजे लॉकर साठी अशी बँक निवडा जी तुमच्या घरापासून जवळ असेल. जर तुम्ही निवडलेल्या बँकेमध्ये तुमचे आधीपासूनच अकाउंट असेल तर ही गोष्ट तुमच्या फायद्याची राहणार आहे.
बँक लॉकर मध्ये काय काय ठेवता येते : अनेकांच्या माध्यमातून बँकेच्या लॉकरमध्ये आपण काय ठेवू शकतो असा प्रश्न विचारला जात होता. खरे तर बँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकांना दागिने, कर्जाची कागदपत्रे, जमिनीची कागदपत्रे, जन्म आणि विवाह प्रमाणपत्रे, विमा पॉलिसी,
सेविंग बॉण्ड्स अशा महत्त्वाच्या गोष्टी आणि कागदपत्रे ठेवता येतात. पण, बँकेसोबत ग्राहक लॉकर घेण्याआधी जो करार करतात त्या करारात लॉकर वापरण्याच्या अटी आणि शर्ती समाविष्ट असतात. ज्या की ग्राहकांनी व्यवस्थित वाचायला हव्यात.