Ahilyanagar News :राहुरीतील जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी खा. नीलेश लंके यांच्या सुचनेची दखल

Published on -
Ahilyanagar News :राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात फायटर जेटमधून पडून जमिनीमध्ये सात फुटांवर रूतून बसलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी करण्यात आला. यासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी लष्करी अधिका-यांच्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. या सुचनांची दखल घेत लष्कराकडून 1 मे रोजी हा बॉम्ब निकामी करण्यात आला.
वरवंडी येथे फायटर विमानातून हा बॉम्ब पडून जमीनीमध्ये रूतल्याने शेतकऱ्यांच्या जल वाहिन्या फुटल्या. त्यामुळे शेतांमधील पीके जळण्याची वेळ आली होती. सात दिवस उलटूनही बॉम्ब हटविण्यासंदर्भात काहीही कार्यवाही झाली नव्हती. खासदार नीलेश लंके यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्टेशन कमांडर आणि लष्करी अधिका-यांसमवेत पार पडलेल्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.
या बैठकीत नागरीकांनाही सहभागी करून घेण्यात आले होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने  आवष्यक त्या उपाययोजना करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले होते. १ मे रोजी लष्करी तज्ञांच्या पथकाने हा जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे काढून तो आपल्या ताब्यात घेतला. हा बॉम्ब निकामी असल्याची माहीती स्टेशन कमांडर यांनी खा. लंके यांना दिली.
हा बॉम्ब निकामी करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांना तसेच नागरीकांना मोठा दिलासा मिळाला असून एक संभाव्य आपत्ती टळली आहे. या घटनेनंतर लष्करी हददीतील समस्या, शैक्षणिक गरजा आणि मंदीर विकास आदी प्रश्नांवरही लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.
चौकट

लष्कराचे आभार 

     नागरीकांच्या जीविताला धोका निर्माण होउ नये म्हणून आम्ही तातडीने कारवाई करण्याच्या निर्देश दिले होते. त्यास लष्करी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करून लष्कराने केलेल्या कारवाईबददल त्यांचे आभार.
खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य

फोटो ओळ

राहुरी कृषि विद्यापीठ परिसरात फायटर विमानातून पडलेला बॉम्ब लष्करी तज्ञांकडून निकामी करण्यात आला.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News