Post Office च्या टाईम डिपॉझिट योजनेत एका लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा…

पोस्ट ऑफिसची FD योजना हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Post Office FD Scheme : अलीकडे सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसला अधिक पसंती दाखवली जात आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विविध बचत योजना राबवल्या जातात आणि या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

दरम्यान, आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका लोकप्रिय बचत योजनेची माहिती पाहणार आहोत. आज आपण पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना गुंतवणूकदारांसाठी कशी फायदेशीर ठरते ? याविषयी माहिती पाहणार आहोत.

कशी आहे पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना?

पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना बँकांच्या एफडी योजनेप्रमाणेच असते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एका निश्चित व्याजदरानुसार रिटर्न दिले जातात. पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्ष कालावधीची असते.

यातील एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% दराने, दोन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सात टक्के दराने, तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने आणि पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट गुंतवणूक करणाऱ्यांना 7.50% दराने परतावा दिला जात आहे.

खरंतर, आरबीआयने अलीकडेच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयानंतर देशातील अनेक बँकांनी एफडी व्याजदरात कपात केली आहे. मात्र पोस्ट ऑफिसच्या एफडी व्याजदरात अजूनही कपात झालेली नाही आणि यामुळे हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून पाहिला जात आहे.

एका लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार? 

पोस्ट ऑफिसच्या एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत जर एखाद्या ग्राहकाने एक लाख रुपये गुंतवले तर त्याला बारा महिन्यांनी म्हणजेच मॅच्युरिटीवर एक लाख 780 रुपये मिळणार आहे म्हणजेच 7 हजार 80 रुपये त्याला रिटर्न मिळतील.

जर पोस्टाच्या दोन वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत एक लाखाची गुंतवणूक केली तर सदर ग्राहकाला 1 लाख 14 हजार 888 रुपये मिळणार आहेत.

तीन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत एका लाखाची गुंतवणूक केली तर सदर ग्राहकाला एक लाख 23 हजार 508 रुपये मिळणार आहेत. तसेच, जर जर समजा पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत एका लाखाची गुंतवणूक केली तर ग्राहकाला एक लाख 44 हजार 995 रुपये मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News