महाराष्ट्राच्या नकाशावर आणखी एक मायानगरी; मुंबई, नवी मुंबई मग तिसरी मुंबई अन आता चौथ्या मुंबईचा प्रस्ताव ! वाचा डिटेल्स

मुंबई शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे आणि यामुळे आता तिसरी मुंबई विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई नंतर लवकरच चौथी मुंबई प्रकल्प सुद्धा हाती घेतला जाणार आहे. मुंबई शहरातील वाढलेला भार पाहता चौथी मुंबई विकसित केली जाणार असून आज आपण तिसऱ्या आणि चौथी मुंबई बाबत माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Mumbai News : मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मुंबईला बॉलिवूड नगरी, मायानगरी म्हणूनही संबोधलं जात. हे राजधानीचे शहर देशाचे आर्थिक केंद्र आहे आणि भविष्यात मुंबईचे महत्व आणखी वाढणार आहे. यामुळे मुंबईला आणखी विकसित बनवले जात आहे.

इथे वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. दरम्यान, मुंबईमधील वाढती लोकसंख्या पाहता आता तिसरी आणि चौथी मुंबई विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका खाजगी वृत्त संस्थेच्या कार्यक्रमात सुतोवाच केले होते.

नक्कीच तिसरी आणि चौथी मुंबई विकसित झाली तर या महानगराच्या विकासाचा झपाटा आणखी वेग घेणार आहे. दरम्यान आता आपण तिसऱ्या आणि चौथ्या मुंबई बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कुठे विकसित होणार तिसरी मुंबई ?

मिळालेल्या माहितीनुसार, तिसरी मुंबई रायगड जिल्ह्यात विकसित केली जाणार आहे. पनवेलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, जेएनपीटी आणि नैना क्षेत्रातील विकास प्रकल्पांमुळे रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई विकसित करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला असून तिसऱ्या मुंबईमुळे नक्कीच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या नागरिकांना मुंबईत आणि नवी मुंबईत राहणे परवडत नाही त्यांच्यासाठी तिसरी मुंबई हा ऑप्शन बेस्ट ठरणार आहे.

चौथी मुंबई कुठे तयार होणार? 

दुसरीकडे तिसरी मुंबईच्या धर्तीवरच पालघर जिल्ह्यात चौथी मुंबई वसविण्याचे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराच्या जवळ विकसित होणारी ही ‘सुपर कनेक्टिव्ह’ सिटी, मुंबई महानगर क्षेत्राच्या आर्थिक आणि भौगोलिक वैभवात मोलाची भर घालणार आहे.

चौथी मुंबईचा हा प्रोजेक्ट सीएम फडणवीस यांचा सुद्धा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असून हा असा प्रकल्प आहे ज्यामुळे येत्या चार-पाच दिवसात मुंबई पूर्णपणे आपल्याला बदललेली दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. रायगड मध्ये तिसरी मुंबई विकसित केली जाणार असून या पाठोपाठ पालघरमध्ये चौथ्या मुंबईचे नियोजन करण्यात आले आहे.

चौथ्या मुंबईत वाढवण बंदर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, मुंबई-पालघर सागरी मार्ग आणि बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प राहणार आहेत. या प्रकल्पांमुळे चौथी मुंबई एक वेल डेव्हलप शहर राहणार असून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. चौथ्या मुंबईसाठी राज्य शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून या प्रकल्पासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाला नियुक्त केले जाणार आहे.

या गावांमध्ये विकसित होणार चौथी मुंबई 

चौथ्या मुंबई बाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पात एकूण 107 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या संबंधित गावांमधील 512 चौ. किमी परिसराचा चौथ्या मुंबई समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वंधवन, आंबीस्तेवाडी, वसगाव, ताडियाले यासह 11 गावांमध्ये 33.88 चौ. किमी क्षेत्रावर विकास केंद्र उभारले जाणार अशी सुद्धा माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून हाती आली आहे.

येथे लॉजिस्टिक पार्क, कंटेनर डेपो, पंचतारांकित हॉटेल्स, कन्व्हेन्शन सेंटर्स आणि एअरस्ट्रिप अशा गोष्टी विकसित केल्या जाणार आहेत. वर्सोवा-विरार-पालघर सी-लिंक प्रकल्पामुळे चौथ्या मुंबईची दळणवळण व्यवस्था फारच सुलभ होणार आहे.

या सी लिंक मुळे नरिमन पॉईंटपासून पालघरचा प्रवास केवळ एका तासात शक्य होईल असा दावा सुद्धा करण्यात आला आहे. म्हणजेच चौथी मुंबईतून मुंबईत येणे फारच सोयीचे राहणार आहे. चौथी मुंबई हा महाराष्ट्राच्या औद्योगिक, वाहतूक आणि नागरी विकासाला नवा आयाम देणारा प्रकल्प ठरणार असा विश्वास जाणकार लोकांकडून सुद्धा वर्तवण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe