रिझर्व बँक ऑफ इंडियाची देशातील ‘या’ 5 बँकांवर कठोर कारवाई ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

देशाच्या मध्यवर्ती बँकेने नुकत्याच पाच महत्त्वाच्या बँकांवर मोठी कारवाई केली असून यामुळे संबंधित बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरे तर या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आरबीआयने देशातील काही महत्त्वाच्या सहकारी बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता पुन्हा एकदा देशातील पाच बड्या बँकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Published on -

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडियाने अलीकडेच देशातील पाच मोठ्या बँकांवर कठोर कारवाई केली आहे. खरंतर या नव्या आर्थिक वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच आरबीआयकडून देशातील काही बँकांचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील एका प्रमुख सहकारी बँकेचा देखील समावेश होता.

खरे तर आरबीआय ही देशातील सहकारी सहकारी तसेच खाजगी बँकांवर लक्ष ठेवून असते तसेच एनबीएफसी कंपन्यांवर देखील आरबीआय ची नजर असते. बँकांना आणि एमबीएफसी कंपनींना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते.

मात्र काही बँका नियमांचे पालन करत नाही आणि अशावेळी आरबीआयकडून अशा बँकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. महत्त्वाचे म्हणजे काही बँकांची आर्थिक परिस्थिती खराब होते आणि अशावेळी त्या सदर बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा अधिकार सुद्धा आरबीआयला आहे.

अशातच आता शुक्रवारी आरबीआय ने देशातील पाच बँकांवर नियमांच उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आज आपण आरबीआयने देशातील कोणत्या पाच बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे आणि याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार याबाबतची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

या बँकांवर आरबीआयची दंडात्मक कारवाई 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आरबीआय कडून आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, अ‍ॅक्सिस बँक बँक ऑफ महाराष्ट्र आणि आयडीबीआय बँक या पाच बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबतचे परिपत्रक सुद्धा मध्यवर्ती बँकेकडून निर्गमित करण्यात आले आहे.

अ‍ॅक्सिस बँक : या बँकेवर 29.60 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला असल्याची माहिती जाणकारांकडून समोर आली आहे. बँकेने “अवैधपणे आंतरविभागीय/ऑफिस अकाऊंट्स ऑपरेशन”च्या संदर्भात रिझर्व बँकेच्या काही निर्देशांचे उल्लंघन केले असल्याने या बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती आरबीआयने आपल्या परिपत्रकातून समोर मांडली.

बँक ऑफ महाराष्ट्र : या बँकेवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे या बँकेवर 31.80 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे. KYC प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्या असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र वर दंडात्मक कारवाई झाली आहे.

आयसीआयसीआय बँक : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक अर्थातच आयसीआयसीआय बँकेवर 97.80 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती परिपत्रकातून समोर आली आहे. बँकेने रिझर्व बँकेच्या ‘सायबर सुरक्षा फ्रेमवर्क इन बँक्स’, ‘नो योर कस्टमर (KYC)’, आणि ‘क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड – इश्यू आणि कंडक्ट’ संबंधित काही निर्देशांचे पालन केले नसल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आयडीबीआय बँक : आयडीबीआय बँकेबाबत बोलायचं झालं तर या बँकेवर 31.80 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेने “किसान क्रेडिट कार्ड” अंतर्गत शेती आणि संबंधित क्षेत्रांसाठी घेतलेल्या थोड्या कालावधीच्या कर्जासाठी असलेल्या व्याज सवलतीच्या योजनांच्या बाबतीत आवश्यक असणाऱ्या काही निर्देशांचे पालन केले नाही, आणि यामुळे मध्यवर्ती बँकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा बाबत बोलायचं झालं तर या देशातील एका प्रमुख सरकारी बँकेकडून RBI 61.40 लाख रुपयांचा दंड वसूल करणार आहे. या बँकेने “बँकिंग सेवांच्या” आणि “ग्राहक सेवांच्या” बाबतीत रिझर्व बँकेच्या काही निर्देशांचे उल्लंघन केले असल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

आरबीआयच्या या कारवाईचा ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नाही. देशाच्या मध्यवर्ती बँकेने ही कारवाई बँकांनी नियमांचे पालन केले नसल्याने बँकांवर केलेली आहे. यामुळे दंडाची रक्कम ही केवळ बँकेकडून वसूल केली जाणार असून ग्राहकांना ही रक्कम भरावी लागणार नाही. तसेच या कारवाईमुळे बँक आणि ग्राहकांमधील व्यवहारांवर कोणताच परिणाम सुद्धा होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe