Google Pixel 9 : तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. विशेषता ज्यांना गुगलचा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की, गुगलचा फ्लॅगशिप स्मार्टफोन गुगल पिक्सल 9 आता ग्राहकांना कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
एका लोकप्रिय शॉपिंग साइटवर या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल दहा हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर सुरू आहे. दरम्यान, आज आपण ही ऑफर नेमकी कुठे सुरू आहे ? याबाबतची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्मार्टफोनची लॉन्चिंग प्राईस काय होती ?

खरे तर गुगल पिक्सल 9 या स्मार्टफोनची लॉन्चिंग प्राईस 79 हजार 999 रुपये एवढी होती. हा स्मार्टफोन ऑगस्ट 2024 मध्ये ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला. मात्र आता हा स्मार्टफोन लॉन्चिंग प्राईस पेक्षा दहा हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. एका ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सुरू असणाऱ्या सेलमध्ये हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
कुठे सुरु आहे डिस्काउंट ऑफर ?
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सध्या Flipkart SASA LELE Sale सुरू आहे आणि याच सेलमध्ये ग्राहकांना Google Pixel 9 स्मार्टफोनवर हजारो रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. या ऑफर मध्ये ग्राहकांना प्राइस कट आणि बँकिंग ऑफरचा लाभ मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या फ्लिपकार्ट वर सुरू असणाऱ्या सेलमध्ये Google Pixel 9 चा 12GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंट स्मार्टफोन 74,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्थातच सध्या या स्मार्टफोनची किंमत लॉन्चिंग प्राईस पेक्षा पाच हजारांनी कमी आहे.
या स्मार्टफोनच्या किमतीत पाच हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे आणि दुसरीकडे यावर बँक ऑफर सुद्धा सुरू आहे. बँक ऑफर बाबत बोलायचं झालं तर एसबीआय क्रेडिट कार्ड द्वारे हा स्मार्टफोन खरेदी केल्यास ग्राहकांना 5750 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.
म्हणजेच ग्राहकांनी जर एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरून हा स्मार्टफोन खरेदी केला तर ग्राहकांना हा स्मार्टफोन लॉन्चिंग प्राईस पेक्षा दहा हजार 750 रुपयांनी स्वस्त मिळणार आहेत. प्राईस कट आणि बँकिंग ऑफरचा लाभ घेतल्यानंतर हा स्मार्टफोन फक्त 69,249 रुपयांना उपलब्ध होणार आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरचा सुद्धा लाभ घेता येणार आहे.
एक्सचेंज ऑफरमध्ये ग्राहकांनी आपल्याकडील जुना फोन एक्सचेंज केल्यास त्यांना 43 हजार 150 रुपयांपर्यंतची बचत करता येणे शक्य होणार आहे. मात्र एक्सचेंज ऑफर अंतर्गत मिळणारा डिस्काउंट जुन्या फोनचे मॉडेल, ब्रँड आणि कंडिशनवर अवलंबून राहणार अशीही माहिती यावेळी देण्यात आली आहे.