55% महागाई भत्ता वाढ लागू होण्याआधीच गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढला

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे. दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याआधीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Published on -

7th Pay Commission : मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढवण्यात आलेला हा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे. दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे.

यामध्ये तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, सिक्कीम अशा राज्यांचा समावेश होतो. या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून यामुळे संबंधित राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी आपल्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार असून या निर्णयाचा देखील राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होईल अशी आशा आहे.

दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याआधीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयाअन्वये राज्यातील काही कर्मचाऱ्यांच मानधन वाढवण्यात आल आहे. दरम्यान आता आपण या शासन निर्णया अंतर्गत कोणत्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार या संदर्भातील आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या राज्य कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 30 एप्रिल 2025 रोजी एक जीआर जारी करण्यात आला. या जीआर नुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

राज्यातील उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रति तास 150 रुपये एवढे मानधन मिळत होते मात्र आता या शिक्षकांना तीनशे रुपये प्रति तास एवढे मानधन मिळणार आहे.

तसेच माध्यमिक शाळांमध्ये घड्याळीत असे का तत्वावर शिकवणाऱ्या शिक्षकांना आधी प्रती तास 120 रुपये एवढे मानधन मिळत होते मात्र आता या शिक्षकांना 250 रुपये प्रति तास एवढे मानधन मिळणार आहे. यामुळे या संबंधित घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगाना अशा विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर वाढवण्यात आला आहे. या संबंधित राज्याच्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 55% इतका झाला असून आता पुढील महिन्यात म्हणजेच जून किंवा जुलै महिन्यात महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा दोन टक्क्यांनी वाढणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू केली जाईल अशी माहिती आली आहे. अर्थातच राज्यातील कर्मचाऱ्यांना ज्यावेळी महागाई भत्ता वाढ लागू होईल त्यावेळी महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe