10 वी झाली की ‘हे’ डिप्लोमा कोर्स करा ! आयुष्य 100% सेट होणार

फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये झालेल्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाची विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठी आतुरता आहे. येत्या काही दिवसांनी या दोन्ही वर्गांचे निकाल सुद्धा आता जाहीर होणार आहेत. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीनंतर काय करायचे असा सवाल विद्यार्थ्यांसमवेत त्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जातोय? म्हणूनच आज आपण दहावीनंतर केल्या जाणाऱ्या कोर्सेसची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Diploma Course : येत्या काही दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावी आणि दहावीचा निकाल 15 मे 2025 पूर्वीच जाहीर केला जाणार आहे. यामुळे अनेकांच्या माध्यमातून दहावी आणि बारावी झाल्यानंतर काय करायचे? कोणते कोर्सेस करायचे असे प्रश्न विचारले जात आहेत.

दरम्यान आता आपण दहावीनंतर केल्या जाऊ शकणाऱ्या डिप्लोमा कोर्सेस ची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या कोर्सेसची माहिती पाहणार आहोत हे असे कोर्सेस आहेत जे केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. जर विद्यार्थ्यांना हे कोर्सेस केल्यानंतर नोकरी लागली नाही तर ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई सुद्धा करू शकतात.

दहावीनंतर हे कोर्सेस करा

10 वी नंतर ITI केल्यास विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणे शक्य आहे. अनेकजण ITI करून सध्या चांगल्या पगाराची नोकरी करत आहे. आयटीआय हा असा व्यावसायिक डिप्लोमा कोर्स आहे जो की ट्रेडनुसार एक ते दोन वर्ष कालावधीचा असतो. मात्र यातील बहुतांशी ट्रेड हे दोन वर्षाचे असतात. आता आपण आयटीआय मधील प्रमुख ट्रेड नेमके कोणते आहेत याबाबतची माहिती पाहूयात. ॲटोमोबाईल, पेंटर, केमिकल, सहाय्यक सिव्हील इंजिनिअर

फिटर, इलेक्ट्रिशियन, ब्युटी पार्लर ( महिलांसाठी ), हेअर कटींग ( पुरुषांसाठी ), टेलरींग ( कपडे शिवणकाम )

कोपा, संगणक विज्ञान, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डिझाईन, डेअरी फार्मिंग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मशिनिस्ट, लाईनमन, टी.व्ही / मोबाईल रिपेअरिंग, टर्नर, वेब डिझाइनिंग, पाईप फिटर आणि मेकॅनिक डिझेल हे आयटीआय मधील प्रमुख ट्रेड आहेत.

या ट्रेड पैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा करता येतो आणि यानंतर चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा लागते. सरकारी नोकरीची देखील संधी उपलब्ध होते. आयटीआय कोर्सेस करण्यासाठी राज्यभर अनेक खाजगी संस्था कार्यान्वित आहे तसेच सरकारी संस्था देखील आहेत.

आपण सरकारी किंवा खाजगी आयटीआय कॉलेज मध्ये हे आयटीआय कोर्सेस करून आपले आयुष्य नक्कीच सेट करू शकता. दहावी मध्ये कितीही पर्सेंटेज मार्क्स असले तरी देखील आयटीआय कोर्सला ऍडमिशन मिळू शकते.

मात्र सरकारी कॉलेजमध्ये आयटीआय कोर्स साठी ऍडमिशन हवं असेल तर परसेंटेज थोडेसे अधिक लागतात. कारण की सरकारी आयटीआय मध्ये सीट्स कमी असतात आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अर्ज करतात.

वैद्यकीय क्षेत्रातील कोर्सेस पण ठरतील फायदेशीर 

जर तुम्हाला आयटीआय डिप्लोमा कोर्स करायचा नसेल तर तुम्ही दहावीनंतर नर्सिंग डिप्लोमा हा कोर्स करू शकता. नर्सिंग डिप्लोमा कोर्स केल्यानंतरही तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकणार आहे. दहावीनंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये जर स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल, लगेचच पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी नर्सिंग डिप्लोमा कोर्स सुद्धा फायद्याचा राहणार आहे.

हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना वैद्यकिय क्षेत्रांमध्ये राहून चांगली नोकरी करता येणार आहे. याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील असे अनेक कोर्सेस आहेत जे की विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरतील जसे की लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट असिस्टंट, रेडिओ तंत्रज्ञ इ. कोर्स आहेत. हे कोर्स केल्यानंतर आपणांस वैद्यकिय क्षेत्रांमध्ये नोकरी लागेल. या कोर्सेस नंतर तुम्हाला सरकारी / खाजगी दवाखान्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळु शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe