आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगारात किती वाढ होणार ? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समोर आली नवीन अपडेट !

आठवा वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरं तर आठव्या वेतन आयोग अंतर्गत पगार किती वाढणार या संदर्भात एक नव अपडेट हाती आल आहे. 

Published on -

8th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. खरंतर 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. या दिवशी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून तेव्हापासून या नव्या वेतन आयोगाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

नवीन वेतन आयोगाला मान्यता दिल्यानंतर नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या अनुषंगाने रोज काहीतरी नवीन डेव्हलपमेंट होत आहे. खरे तर आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शन धारकांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

दरम्यान आता आपण नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती वाढणार? याबाबत काय नवीन अपडेट हाती आले आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना कधी होणार?

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा निर्णय जानेवारी महिन्यात घेण्यात आला आहे मात्र अजूनही याच्या समितीची स्थापना झालेली नाही आणि म्हणूनच सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचारी नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेची वाट पाहत आहेत.

पण, गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन केला जाईल. यामुळे या चालू महिन्यात नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची शक्यता वर्तवली जात आहे.

यासाठी पॅनेलमध्ये सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती करावी लागणार आहे जी की लवकरच होईल अशी माहिती समोर येत आहे. खरेतर, केंद्र सरकार एप्रिलमध्येच आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना करणार अशी आशा कर्मचाऱ्यांना होती, परंतु, एप्रिल महिना वाट पाहण्यातच गेला.

एप्रिल महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना काही शक्य झाली नाही पण आता या चालू मे महिन्यात ही समिती स्थापित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

किती वाढणार पगार

आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे. दरम्यान आता आठव्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती वाढणार याबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे ठरणार आहे. सध्याच्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका ठरवण्यात आला होता. यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 7,000 रुपयांवरून थेट 18,000 रुपयांवर पोहोचले.

आता आठव्या वेतन आयोगात, फिटमेंट फॅक्टर 2.28 ते 2.86 दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. असे झाले असे सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून थेट 41 हजार ते 52 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र खरंच सरकार एवढा फिटमेंट फॅक्टर लागू करणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News