पाथर्डीतील वाहक महिलेला मारहाण करणाऱ्यांवर चोवीस तासांत आरोपपत्र !

पाथर्डीतील एसटी वाहक महिलेला तिकीट घेतल्यावर मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या दोघांविरुद्ध चोवीस तासांत आरोपपत्र दाखल झाले आहे, पोलीस निरीक्षक रामदास सोनवणे यांच्या तत्काळ कार्यवाहीमुळे पीडित महिलेला न्याय....

Published on -

एसटीमध्ये तिकीट काढण्यास नकार देत तिकिटाचे पैसे मागणाऱ्या वाहक महिलेला मारहाण व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध दोन दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे काम पोलिस हे. काँ. रामदास सोनवणे यांनी केले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध तातडीने आरोपपत्र दखल करत पोलिसांनी सरकारच्या १०० दिवसांच्या गतिमान प्रशासनाची झलक दाखविली आहे. पाथर्डी एसटी आगारात राधाबाई दामोदर अबूज (रा. दैत्यनांदूर, ता. पाथर्डी, हल्ली रा. आनंदनगर पाथर्डी) या एसटी महामंडळात वाहक म्हणून काम करतात.

त्या राहुरी-पाथर्डी एसटी घेऊन जात असताना महादेव अंबादास दातीर (वय ३०) व गोरख देविदास दातीर, (वय २८, रा. अकोला, ता. पाथर्डी हे एसटीमध्ये बसलेले होते. त्यांना तिकीट घेण्याचे सांगून पैसे मागितल्याचा राग आला.

त्यांनी तिकिटाचे पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ व मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणला. २१ एप्रिल रोजी हा गुन्हा रात्री उशिरा दाखल झाला. पुढच्या चोवीस तासांत पो. हे. कॉ. रामदास सोनवणे यांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेतले.

सरकारी साक्षीदार तपासले आणि सर्व कागदपत्रे जोडून तत्काळ पाथर्डीच्या न्यायालयात आरोपपत्रदेखील सादर केले. एखाद्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाला तर चार ते पाच वर्षे वाट पाहुनही कोर्टात चकरा माराव्या लागतात.

मात्र, जलदगतीने तपास करून आरोपपत्र चोवीस तासांत दाखल झाल्याने हल्ला झालेल्या महिलेने समाधान व्यक्त केले आहे. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी हे. काँ. रामदास सोनवणे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News