जगातील सर्वात महागडी शाळा कोणती ? एका वर्षाची फी किती ?

भारतीय संविधानाने देशातील नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान केले आहे आणि याच मूलभूत हक्कात शिक्षणाचा हक्क सुद्धा समाविष्ट आहे. एवढेच नाही तर संविधानात मुलांना शिक्षण देणे हे मूलभूत कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. यामुळे सरकारही सर्वच मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी आग्रही असून यासाठी वेगवेगळे धोरण तयार करत असते. आपल्या देशातील सरकारी शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून नाममात्र फी घेऊन शिक्षण दिले जात आहे. तर दुसरीकडे अशीही एक शाळा आहे ज्याची वार्षिक फी पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील.

Published on -

Expensive School : आज, 5 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. एचएससी अर्थातच बारावी बोर्डाचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन बघता येणार आहे. बारावीचा निकाल लागला की काही दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

राज्य बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल 15 मे च्या आतच लागणार आहेत. म्हणजेच दहावी बोर्डाचा निकाल सुद्धा 15 मे 2025 च्या आधीच लागून जाईल. दुसरीकडे शालेय विद्यार्थ्यांचा निकाल म्हणजेच पहिली पासून ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा निकाल दरवर्षीप्रमाणे एक मे ला जाहीर करण्यात आला आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले असल्याने सध्या शाळांमध्ये प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. अजून ऍडमिशनची प्रोसेस सुरू झालेली नाही मात्र ऍडमिशन साठी आवश्यक असणारी पूर्वतयारी विद्यार्थ्यांकडून सुरू करण्यात आली आहे.

यामुळे तहसील कार्यालयांमध्ये कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी पालक आणि विद्यार्थी मोठी गर्दी सुद्धा करत आहेत. दरम्यान, अशी सारी परिस्थिती असतानाच सध्या एक अशी शाळा चर्चेत आहे जी की जगातील सर्वात महागडी शाळा असल्याचे बोलले जात आहे. खरे तर, अलीकडे भारतात शिक्षणावर मोठा पैसा खर्च करावा लागतोय.

आपल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना अगदीच तारेवरची कसरत करावी लागत असून पोटाला चिमटा देऊन सर्वसामान्य नागरिक आपल्या मुला मुलींना शिकवत आहेत. पण, तुम्हाला जगातील सर्वात महागडी शाळा कोणती याची माहिती आहे का? नाही ना मग आता आपण याचीच माहिती पाहणार आहोत.

ही आहे जगातील सगळ्यात महाग शाळा 

मीडिया रिपोर्ट नुसार, स्वित्झर्लंडमधील Institut Le Rosey ही जगातील सर्वाधिक महागडी शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेत मुलांना एक वर्ष शिकवण्याची किंमत ही एका मर्सिडीज एवढी आहे. कदाचित तुम्हाला हे खरं वाटणार नाही पण या या शाळेची फी तेवढीच आहे. ही शाळा फारच भव्य आहे आणि आपल्या भव्यतेसाठी आणि उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी या शाळेचा संपूर्ण जगात नावलौकिक झालेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्वित्झर्लंडमधील या बोर्डिंग शाळेला दोन कॅम्पस आहेत. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी टेनिस कोर्ट, शूटिंग रेंज तयार करण्यात आले आहे आणि सुमारे 4 अब्ज रुपये खर्चून बांधलेला कॉन्सर्ट हॉल सुद्धा आहे. ही शाळा दर्जेदार शिक्षणासाठी ओळखली जातेच शिवाय लक्झरी जीवनशैलीसाठीही ही शाळा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.

शाळेची एका वर्षाची फी किती? 

या शाळेची वार्षिक फी किती आहे ? तर या शाळेत अब्जाधीशांची मुलं शिकायला आहेत. या शाळेची वार्षिक फी ही जवळपास 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. या फीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच निवास, आहार दिला जातो आणि यासोबतच विविध शैक्षणिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना सहभाग मिळतो.

असं म्हणतात की या शाळेत जगभरातील 50 हून अधिक देशांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. म्हणजेच हे एक ग्लोबल स्कूल आहे. या शाळेत काही देशांच्या राजघराण्यांतील मुलंही शिक्षण घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या शाळेची स्थापना 1880 मध्ये झालीये, म्हणजेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच ही शाळा अस्तित्वात आली आहे. या शाळेचे संस्थापक पॉल कर्नल हे होते. सध्या या शाळेत जवळपास 280 विद्यार्थी शिकत आहेत, असा दावा करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News