Government Employee News : केंद्रातील मोदी सरकारने मार्च 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला. मार्च महिन्यात मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळत होता, मात्र यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करण्यात आली म्हणजेच महागाई भत्ता 55 टक्क्यांवर पोहोचला आणि महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ नेहमीप्रमाणेचं जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली.
महागाई भत्ता वाढीबाबत बोलायचं झालं तर, केंद्रातील सरकारकडून एका वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो आणि याबाबतचा अधिकृत निर्णय हा अनुक्रमे मार्च आणि सप्टेंबर महिन्यात घेतला जातो.

सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणारी महागाई भत्ता वाढ एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीवर अवलंबून असतो. एआयसीपीआयच्या जानेवारी ते जून या कालावधीच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो.
म्हणजेच जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीच्या एलआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे आणि आता जानेवारी ते जून या कालावधीच्या आकडेवारीनुसार जुलै 2025 पासूनची महागाई भत्ता वाढ ठरणार आहे. दरम्यान आता आपण जुलै 2025 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
किती वाढणार DA ?
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता जुलै 2025 पासून सुधारित केला जाणार आहे, जो की जानेवारी ते जून 2025 या कालावधीमधील एआयसीपीआय निर्देशांकावर अवलंबून राहणार आहे. आतापर्यंत एआयसीपीआयचे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे आकडे समोर आले आहेत.
आता एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांची आकडेवारी समोर येईल आणि त्यानंतर मग जुलै 2025 पासून प्रत्यक्षात महागाई भत्ता किती वाढणार हे क्लिअर होणार आहे. जानेवारी 2025 पासून दोन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली मात्र ही गेल्या 78 महिन्यांमध्ये सर्वात कमी वाढ होती. दरम्यान आता जुलै महिन्यापासून लागू होणारी महागाई भत्ता वाढ देखील फारच कमी राहणार असे दिसते.
आतापर्यंत फक्त 3 महिन्यांची आकडेवारी समोर आली आहे मात्र असे असले तरी जुलै 2025 पासून महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनीच वाढणार अशी माहिती काही लोकांकडून समोर येत आहे. जर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला तर हा महागाई भत्ता 57% वर पोहोचणार आहे.
एआयसीपीआयच्या आकडेवारी बाबत बोलायचं झालं तर जानेवारी 2025 मध्ये, एआयसीपीआय निर्देशांक 143.2 होता परंतु एआयसीपीआय-आयडब्ल्यू फेब्रुवारीमध्ये 0.4 गुणांवरून 142.8 वर घसरला, पण मार्चमध्ये तो 2 गुणांनी वाढला आणि परत 143 वर पोहोचला. मार्च 2025 मध्ये सीपीआय आधारित किरकोळ महागाई 5 वर्षांच्या नीचांकी 3.34% पर्यंत पोहोचली, तर फेब्रुवारीमध्ये ती 3.61% होती.
जर हा क्रम असाच चालू राहिला आणि पुढील 3 महिन्यांत एआयसीपीआय पॉइंट्स मोठ्या प्रमाणात वाढलेत तर 3% महागाई भत्ता वाढ लागू होऊ शकते परंतु जर आकडेवारी डाऊन झाली तर डीए वाढ फक्त दोन टक्के होईल असे म्हटले जात आहे. तथापि याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर महिन्याच्या आसपास घेतला जाणार आहे आणि जुलै महिन्यापासून ही वाढ लागू होणार आहे.
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार?
केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 55% करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात आला आहे. राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात झारखंड तेलंगाना सिक्कीम या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्राच्या धर्तीवर 55% करण्यात आला आहे.
दरम्यान, आता राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील लवकरच सुधारित होणार आहे. सध्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय, पण येत्या काही दिवसांनी हा भत्ता 55% एवढा केला जाणार आहे आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू केली जाईल.