Hapus Mango Rate : गेल्या महिन्याच्या सुरुवातीला हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. गुढीपाडव्याच्या दरम्यान हापूसला बाजारात अधिक भाव मिळाला. मात्र गुढीपाडवा झाल्यानंतर हापूसच्या रेटमध्ये सातत्याने घसरण झाली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देखील बाजारात हापुसचे रेट कमीच होते.
दरम्यान आता हापूस चा हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता आपण हापूसचा हंगाम आणखी किती दिवस सुरू राहणार आणि हापूसला सध्या काय रेट मिळतोय याबाबतचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हापूसचा हंगाम आणखी किती दिवस सुरु राहणार?
यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात हापूसची मोठी आवक झाली होती. मात्र यावर्षी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हापूसला बाजारात अपेक्षित अशी मागणी पाहायला मिळाली नाही. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापुसला चांगली मागणी असते आणि दरही चांगला असतो.
मात्र यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरही हापूसला अपेक्षित भाव मिळाला नाही तरीही मागणी देखील खूपच कमी राहीली. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बाजारात हापूसची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती आणि मालाला एवढा अधिक उठाव पण मिळत नव्हता यामुळेच हापूस चे रेट अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरही दबावातच दिसले.
दरम्यान वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी हापुसच्या हंगामाबाबत मोठी माहिती दिली आहे. व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम आता जवळपास अंतिम टप्प्यात आला असून आता फक्त काही दिवसच बाजारात कोकणातील हापूस दिसणार आहे.
हापूसचा हंगाम आता फक्त 10 दिवसच चालणार आहे. यंदा हवामानातील बदलांमुळे हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. दरम्यान आता हापूसची आवक सातत्याने कमी होऊ लागली आहे.
यामुळे आता पुढील दहा दिवसात हापूसचा हंगाम करू शकतो असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, आता आपण हापूसचे सध्याचे रेट काय आहेत ? याविषयी माहिती पाहणार आहोत.
हापूसचे सध्याचे रेट कसे आहेत ?
वाशी येथील एपीएमसी मध्ये सध्या 40 ते 50 हजार हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक होत आहे. या एपीएमसी मध्ये दररोज कोकणातून 40 ते 50 हजार हापुस पेट्या दाखल होत आहेत.
एपीएमसीमध्ये सध्या पाच डजनाची पेटी बाराशे ते पंधराशे रुपये आणि चार डजनाची पेटी 2,500 ते 3,500 रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.