1.16 ट्रिलियनचे साम्राज्य सांभाळणार ‘हा’ व्यक्ती; कोण आहे वाॅरेन बफेट यांचा उत्तराधिकारी? का आलाय चर्चेत?

Published on -

बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ वॉरेन बफेट सहा दशके कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस निवृत्त होणार आहे. स्वतःच्या १.१६ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या व्यावसायिक साम्राज्याची सूत्रे ग्रेग एबेल यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ओमाहा येथे झालेल्या कंपनीच्या वार्षिक शेअरहोल्डर बैठकीत, वॉरेन बफेट यांनी घोषणा केली. ग्रेग एबेल या वर्षाच्या अखेरीस कंपनीचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील. ग्रेग एबेल सध्या बर्कशायर हॅथवे येथे नॉन-इन्शुरन्स ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष आहेत.

कोण आहेत ग्रेग एबेल?

ग्रेग एबेल यांचा जन्म कॅनडातील एडमंटन येथे झाला. ते व्यवसायाने अकाउंटंट आहेत. एबेलने १९८४ मध्ये अल्बर्टा विद्यापीठातून अकाउंटिंगमध्ये बॅचलर पदवी घेतली. बर्कशायर हॅथवे एनर्जीचे माजी सीईओ एबेल यांना युटिलिटी, रेल्वे आणि रिटेल व्यवसायांचे सखोल ज्ञान आहे. ग्रेग एबेल सध्या आयोवा येथील डेस मोइन्स येथे राहत असल्याचेही काही बातम्यांमध्ये सांगितले गेले आहे. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे १ अब्ज डॉलर्स आहे.

कसे चर्चेत आले एबेल?

एबेलने बर्कशायर हॅथवे एनर्जीमधील त्याचा १% हिस्सा तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२२ मध्ये ८७० दशलक्ष डॉलर्सला विकला. पाच मोठ्या जपानी कंपन्यांमध्ये बर्कशायरची गुंतवणूक वाढवण्याच्या निर्णयातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वॉरेन बफेट यांनी कंपनीच्या सीईओ म्हणून ग्रेग एबेल यांची नियुक्ती जाहीर केली असली तरी, कंपनीच्या संचालक मंडळाची अधिकृत मान्यता त्यांना मिळालेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe