Maharashtra Vande Bharat Express : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याला लवकरच एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून राज्याला लवकरच बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.
ही बारावी वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातील दोन राजधान्यांना कनेक्ट करणार आहे. खरे तर , सध्या स्थितीला राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर,

नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या 11 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. दरम्यान आता राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी वाढणार आहे कारण की राज्याला लवकरच बारावी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे.
राज्यातील बारावी वंदे भारत ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला मिळणारी बारावी वंदे भारत ट्रेन ही राजधानी मुंबईवरून उपराजधानी नागपूर या शहरादरम्यान चालवली जाणार आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान सुरू होणारी वंदे भारत ट्रेन राज्यातील बारावी वंदे भारत ट्रेन राहणार असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास अधिक वेगवान होईल अशी आशा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
वास्तविक सद्यस्थितीला मुंबई ते नागपूर दरम्यान ज्या एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत त्यांना या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 14 ते 20 तासांचा वेळ लागतो. परंतु वंदे भारत एक्सप्रेस मुळे हा प्रवासाचा कालावधी 8 ते 9 तासापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच भविष्यात मुंबई ते नागपूर हा प्रवास वंदे भारत एक्सप्रेस मुळे अवघ्या 9 तासात शक्य आहे. दरम्यान आता मुंबई – नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे ही गाडी राज्यातील कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेऊ शकते या संदर्भात मोठी माहिती समोर येत आहे.
‘या’ रेल्वे स्थानकावर थांबणार मुंबई – नागपूर वंदे भारत एक्सप्रेस
मुंबई – नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन या दोन्ही शहरादरम्यानचे 837 किलोमीटर लांबीचे अंतर अवघ्या आठ ते नऊ तासात कापू शकते. म्हणजेच मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास पाच ते सहा तासांचा कालावधी वाचणार आहे.
महत्त्वाची बाब अशी की, ही गाडी राज्यातील जवळपास आठ महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार आहे. मुंबई नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील दादर, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर केला जाऊ शकतो असा दावा मिळेल रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.