महाराष्ट्रातील ‘या’ शहरांत धावणार मिडी बस; काय आहे या बसचे वैशिष्ट्य ? सेवा कधी सुरु होणार ? वाचा संपूर्ण माहिती

Published on -

चिंचोळ्या रस्त्यावर विनाव्यत्यत धावू शकतील, अशा मिडी बस गेल्या काही वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात होत्या. कालांतराने त्याची लोकप्रियता कमी झाली. मात्र आता वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येमुळे याच मिडी बस पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली मुंबई बेस्टने सुरु केल्या आहेत. मुंबईत २०० मिडी बस सुरु करण्यासाठी लवकरच निवीदा काढण्यात येणार आहेत. पावसाळ्यानंतर या मिडीबस रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत.

काय आहेत मिडी बस?

लहान व चिंचोळ्या मार्गांवर बेस्टची सुविधा निर्विघ्न सुरु करण्यासाठी मिडी बस काही वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. मात्र बेस्टने मालकीच्या आयुर्मान संपलेल्या मिडी बस भंगारात काढणे, मालकीच्या व खासगी मिडी बसगाड्यांविरोधात प्रवाशांच्या विविध तक्रारी आदी कारणांमुळे मिडी बसची संख्या कमी झाली. गेल्यावर्षी म्हणजेच २०२४ मध्ये सुमारे 1,600 मिडी बस होत्या. हीच संख्या नंतर 865 वर आली. त्यापैकी 625 भाडेतत्त्वावरील मिडी बस असून, 240 या बेस्टच्या मालकीच्या मिडी बस आहेत.

कुठे धावणार मिडी बस?

मुंबईकरांचा प्रवास जलद व निर्विघ्न होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच बेस्टच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. गल्लोगल्ली सेवा देण्यासाठी, तसेच उत्पन्नवाढीसाठी लहान आकाराच्या बस चालवण्याची सूचना त्यांनी केली. त्यानंतर आता बेस्ट उपक्रमाने २०० मिडी एसी बस भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून येत्या ऑक्टोबरपासून या बस सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. भांडुप, विक्रोळी, मालाड, अंधेरी आदी भागांत त्या चालवण्याचे नियोजन आहे.

एक हजार नव्या बस

बेस्टच्या ताफ्यात एकूण २ हजार ७५८ बस आहेत. त्यापैकी ६३९ बेस्टच्या मालकीच्या आणि २ हजार ११९ भाडेतत्त्वावरील बस आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत भाडेतत्त्वावरील एक हजार बसगाड्या दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजेच या वर्षांच्या अखेरीस मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद करण्याचे नियोजन बेस्टने केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe