मदतीपासून एकही शेतकरी वंचित ठेवू नका उर्जामंत्री तनपुरे यांच्या प्रशासनाला सुचना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- अतिवृष्टीमुळे  शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले असून, प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी. शेतकरी मदतीपासून वंचित राहणार याची प्रत्येक प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्याने खबरदारी घ्यावी.

यासाठी सरसकट पंचनामे करून सरकारची मदत प्रत्येक लाभधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम व्यवस्थीतपणे करा. अशा स्पष्ट सूचना मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनाला दिल्या.

राहुरीचा माणूस आमदार झाला तर नगर पाथर्डी तालुक्याला पाणी मिळणार नाही, ते या दुष्काळी भागाकडे कधी फिरकणार देखील नाहीत अशा पद्धतीचे आरोप विरोधकांकडून केले जात होते. मात्र नगर पाथर्डी तालुक्याला वांबोरी चारीचे पाणी देण्याचे काम आपण केले.

त्यामुळे यापुढे तरी विरोधकांनी असे बिनबूडाचे आरोप करू नयेत, त्यांनी केलेले आरोप आपण एक वर्षभरातच खोडून काढत. मागील लोकप्रतिनिधीचा वेळ पोलिस फेऱ्यातच अधिक गेल्याने

त्यांना मुळा धरणात पाणी असून, देखील शेतकऱ्यांपर्यत व्यवस्थीत पोहचवता आले नाही अशा शब्दात मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी किर्डिले यांचे नाव न घेता टीका केली.

सध्या कोरोणाची परिस्थिती असल्यामुळे काही प्रमाणात निधीची कमतरता भासत असली तरी विकास कामात कुठे कमी पडणार नाही दिलेला शब्द पूर्णपणे पाळण्याचे काम केले जाईल.

एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये अतिवृष्टीच्या काळामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन या संकटाचा सामना करावा अशा परिस्थितीमध्ये कोणी पक्ष पार्टी पाहू नये असे आवाहनही ना.तनपुरे यांनी यावेळी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment