राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ; ‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढला ! किती वाढला डीए ?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात 53% वरून 55% करण्यात आला आणि जुलै महिन्यापासून हा महागाई भत्ता आणखी दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजे आगामी काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 57 टक्क्यांवर पोहोचणार आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जातोय.

Published on -

7th Pay Commission DA : देशातील काही राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित करण्यात आला आहे. खरेतर, 2025 हे नववर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फारच खास ठरले आहे. या नव्या वर्षात आत्तापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली.

यानंतर मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला. याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात झाला मात्र ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे.

या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के इतका झाला आहे. दरम्यान, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाच्या रकमेचाही लाभ मिळाला आहे. दुसरीकडे, केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर अरुणाचल प्रदेश येथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही वाढ सुद्धा जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे. म्हणजेच या संबंधित कर्मचाऱ्यांना जानेवारी ते एप्रिल या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

अरुणाचल प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार असून मे महिन्याच्या पगारासोबत या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे.

अरुणाचल प्रदेश राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा राज्यातील जवळपास 68 हजार कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 33 हजार पेन्शनधारकांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सोशल मीडिया अकाउंट एक्स वर शासनाच्या या निर्णयाची माहिती दिली.

मुख्यमंत्री महोदयांनी सोशल मीडिया हँडलवर असे म्हटले की, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. अरुणाचल प्रदेश सरकारने महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलत भत्ता (डीआर) मध्ये 2% वाढ जाहीर केली आहे. यामुळे 1 जानेवारी 2025 पासून मूळ वेतन आणि पेन्शनचा दर 53% वरून 55% पर्यंत वाढेल.

या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढलाय 

केंद्रानंतर आता राज्य सरकारांनीही महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, आसाम, उत्तराखंड आणि ओडिशा सरकारने त्यांच्या राज्यातील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढवला आहे. महत्त्वाचे म्हणजे या सर्व राज्यांनी सुधारित केलेले महागाई भत्त्याचे नवीन दर जानेवारी 2025 पासून लागू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe