FD Investment : फिक्स डिपॉझिट करुन तुम्हाला पैसे तिप्पट करता येतील; कसे ? तर वाचा ही सोप्पी स्किम

पोस्ट ऑफिसच्या सोप्या स्कीममधून पैसे तिप्पट कसे कराल? जाणून घ्या व्याजदर, मुदत आणि टॅक्स बेनिफिटसह गुंतवणुकीचा गणिती फॉर्म्युला

Published on -

अनेक बँका व अनेक पतसंस्थांमध्ये सध्या पैसे गुंतवणुकीचे अनेक पर्यांत उपलब्ध आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून इतर बँका व पतसंस्थांमध्ये पैसे बुडण्याची उदाहरणे पाहिल्यानंतर सामान्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणुचे पर्याय स्विकारले. गेल्या काही वर्षांपासून पोस्ट ऑफीसमध्ये एफडी करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु एफडीतही तुमचे पैसे तुम्हाला तिप्पट करता येतात, हे माहित आहे का? तुम्ही एफडीद्वारे तुमची रक्कम तिपटीने वाढवू शकता.

कशा आहे एफडी योजना?

पोस्ट ऑफीसमध्ये अनेक प्रकारच्या एफडी योजना आहेत. त्यात एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांचा पर्यायही उपलब्ध आहे. परंतु तुम्हाला जर तुमची रक्कम तिप्पट करायची असेल तर, तुम्हाला पाच वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी लागेल. पोस्ट ऑफीसच्या पाच वर्षांच्या एफडीमध्ये 7.5 टक्के व्याज मिळते. इन्कम टॅक्स अँक्ट 80 सी अंतर्गत यावर टॅक्स बेनिफीटही मिळते.

वाढवावी लागेल मॅच्युरिटी

तुम्हाला जर तुमची रक्कम तिप्पट करायची असेल, तर तुम्हाला तुमची एफडी दोन वेळा वाढवावी लागेल. पोस्ट ऑफीसमध्ये एफडी केल्यावर ती मॅच्युरिटीपूर्वी वाढवता येते. असे एक्स्टेन्शन तुम्हाला दोन वेळा करावे लागेल. म्हणजेच तुम्हाला तुमचे पैसे तब्बल 15 वर्षे ठेवावे लागतील. उदा. जर तुम्ही एफडीमध्ये 5 लाख रुपये ठेवले तर तुम्हाला पाच वर्षांच्या रकमेवर 7.5 टक्के व्याज मिळते. म्हणजेत तुम्हाला 2,24,974 रुपये व्याज मिळेल. म्हणजेत तुम्हाला पाच वर्षांनी 7,24,974 रुपये मिळतील.

रक्कम तिप्पट कशी होईल?

तुम्ही पाच वर्षे पाच लाख रुपये ठेवले तर तुम्हाला जवळपास साडेसात लाख रुपये मिळतील. त्यानंतर तुम्ही पुढची पाच वर्षे ही रक्कम ठेवली तर तुम्हाला 10 वर्षानंतर 10 लाख 51 हजार 175 रुपये मिळतील. ते मॅच्युअर होण्यापूर्वी तुम्हाला परत पाच वर्षे ही एफडी वाढवावी लागेल. 15 व्या वर्षी तुमची पाच लाखांची गुंतवणूक आता थेट 15 लाख 24 हजार 149 रुपयांपर्यंत जाईल. म्हणजेच तुमची रक्कम तिपटीपेक्षा जास्त वाढेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe