फक्त 100 रुपयांची ‘ही’ वस्तू वाढवते तुमच्या बाईकचे मायलेज; प्रत्येकाला माहिती असावी ही गोष्ट

Published on -

Bike Mileage Tips : सध्या घरोघरी दुचाकी गाड्या आहेत. प्रत्येक कुटुंबाची ती गरज बनली आहेत. परंतु बाईक वापरताना तिची काळजी घेणे ही महत्त्वाचे आहे. वेळेवर देखभाल न झाल्यामुळे बाईकमध्ये अनेक समस्या उद्भवतात. बाईकची वेळेवर देखभाल केली नाही तर, तिचे मायलेज देखील कमी होते. दुचाकीच्या योग्य मायलेजसाठी फक्त 100 ते 150 रुपयांचा एक पार्ट खूप महत्त्वाचे काम करतो. तो पार्ट आपण वेळेवर बदलला तर तुमची बाईक टकटक चालते.

बाईकची काळजी महत्त्वाची

बाईकचा मायलेज चांगला ठेवण्यासाठी इंजिन ऑइल, एअर फिल्टर, ऑइल फिल्टर अशा अनेक गोष्टी वेळेवर बदलणे आवश्यक आहे. अनेकजण गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर करतात. तरीही त्यांची गाडी मनासारखे अँव्हरेज देत नाही. अनेकदा चांगल्या मॅकॅनिकच्याही बाईकची छोटी गरज लक्षात येत नाही. बाईक रायडर्स किंवा मेकॅनिक लक्ष देत नाहीत, अशी एक 100 ते 150 रुपयांची वस्तू आहे, जी गाडीचे मायलेज वाढवते.

100 रुपयांची वस्तू वाढवते मायलेज

प्रत्येक गाडीमध्ये स्पार्क प्लग असतो. तो अनेकदा खराब होतो, परंतु त्याकडे आपले लक्ष जात नाही. हाच स्पार्क प्लग आपल्या गाडीचे अँव्हरेज चांगले ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. स्पार्क प्लगच्या समस्या सामान्यतः BS-4 किंवा त्याहूनही जुन्या बाइक्समध्ये दिसतात. ज्यामध्ये इंधन इंजेक्शन (FI) प्रणाली नसते.

प्लगची घ्या काळजी

बाईक चालत असताना, स्पार्क प्लगमध्ये कार्बन जमा होतो. ज्यामुळे बाईकला धक्का बसतो. स्पार्क प्लग स्वच्छ करून पुन्हा वापरता येतो. परंतु जर तो खूप खराब झाला असेल तर तो बदलणे चांगले. बाजारात कोणत्याही चांगल्या कंपनीच्या स्पार्क प्लगची किंमत 100 ते 150 रुपयांपर्यंत असते. आवश्यक असल्यास तुम्ही ते मेकॅनिककडून बदलू शकता.

मायलेज वाढवण्यासाठी टिप्स

बाईकचा मायलेज वाढवण्यासाठी नियमित सर्व्हिसिंग आवश्यक आहे. यासाठी, तुमच्या बाईक मॉडेलचा शिफारस केलेला सर्व्हिस इंटरव्हल तपासणे महत्त्वाचे आहे. हे बाईकच्या मॅन्युअलमध्ये लिहिलेले आहे. जर तुमच्याकडे मॅन्युअल नसेल, तर तुम्ही इंटरनेटवर तुमच्या बाईक मॉडेलचे नाव टाकून सर्व्हिस इंटरव्हल शोधू शकता. यामुळे तुम्हाला सायकलची सर्व्हिसिंग किती वेळा करावी लागेल हे कळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe