Maharashtra Schools : यावर्षी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे. राज्य बोर्डाचा एचएससी म्हणजे 12 वी चा निकाल पाच मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला.
खरंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार हा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता.

दरम्यान या संदर्भात बारावीचा निकाल लागण्याच्या आधीच राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मोठी अपडेट दिली होती. गोसावी यांनी दहावी आणि बारावीचा निकाल 15 मे 2025 च्या आधीच जाहीर केला जाईल असे जाहीर केले होते.
ते म्हणाले होते की यावर्षी दहावी आणि बारावीच्या एक्झाम लवकर झालेल्या आहेत आणि यामुळे या दोन्ही वर्गांचे निकाल देखील वेळेच्या आधीच जाहीर करण्याची आमची योजना आहे.
महत्वाची बाब म्हणजे यावर्षी पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकला नाही आणि म्हणूनच वेळेत पेपर तपासणीचे कामे सुद्धा पूर्ण झालेली होती. यामुळे बारावीचा निकाल हा वेळेच्या आधीच म्हणजेच पाच मेला जाहीर झाला.
दरवर्षी बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जात असतो आणि त्यानंतर मग दहावीचा निकाल लागतो. दहावीचा निकाल साधारणता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो.
गेल्यावर्षी मात्र दहावीचा निकाल देखील मे महिन्याच्या शेवटीच लागला होता. दरम्यान शैक्षणिक वर्ष 2024 – 25 चा बारावी बोर्डाचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर झाल्यानंतर आता दहावी बोर्डाच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार?
मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल बारावीच्या निकालानंतर दहा दिवसांनी जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 15 मे 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.
बोर्डाने दहावीच्या निकालाचे अधिकृत तारीख जाहीर केलेली नसली तरी देखील राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 15 मे 2025 पर्यंत दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती दिली होती यानुसार दहावी बोर्डाचा निकाल हा 15 मे च्या आधीच जाहीर होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. यामुळे सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
निकाल कुठे पाहणार ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in, mh-ssc.ac.in, sscboardpune.in या वेबसाइटवर दहावी बोर्डाचा निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.