Credit Card : कार्ड घेताय? मग अगोदर ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठे नुकसान

Published on -

क्रेडिट कार्ड असणे, ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. सध्याच्या काळात कोणतीही कंपनी स्वत:हून क्रेडिट कार्ड ऑफर करत असते. एवढंच नाही, तर ते घेण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देखील दिल्या जातात. सध्याच्या काळात प्रत्येकाला आपल्याकडे क्रेडिट कार्ड असावे असे वाटते. मात्र, क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

कायम लक्षात ठेवा या गोष्टी

1. क्रेडिट कार्डची थकबाकीची रक्कम वेळेवर न भरल्यास त्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्याज द्यावे लागते. कधी कधी 34 टक्के, 36 टक्के किंवा 48 टक्के वार्षिक व्याज भरावे लागू शकते.

2. प्रत्येक क्रेडिट कार्डची एक निश्चित मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली जाणार नाही याची काळजी घ्या. तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा 1 लाख रुपये असेल तर तुमची बिलं देखील त्याच मर्यादेत ठेवावीत.

3. क्रेडिट कार्डच्या वापराच्या एकूण मर्यादेच्या गुणोत्तराला क्रेडिट कार्ड युटिलायझेशन रेशो म्हणतात. हे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे. उदारहणार्थ तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा 1 लाख रुपये असेल तर कार्डवर 30 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च न करण्याचा प्रयत्न करा.

4. तुम्ही क्रेडिट कार्ड घेणार असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की चांगला क्रेडिट स्कोअर कायम ठेवण्यासाठी तुम्हाला तुमची बिलं हे एकूण क्रेडिट लिमिटच्या जवळपास 30 टक्क्यांपर्यंतच ठेवावे.

5. क्रेडिट कार्ड बिल भरण्या तुमचा क्रेडिट स्कोअरवर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे तुम्ही तुमची बिले वेळेवर भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो आणि तुमच्या कार्डची क्रेडिट लिमिट वाढू शकते. उदाहरणार्थ तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा 5 लाख रुपये असेल आणि तुम्ही वेळेवर बिल भरत राहिल्यास तुमची क्रेडिट मर्यादा आणखी वाढून 7.5 लाख रुपये होण्याची शक्यता असते.

6. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरून एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला 45 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो. परंतु विहित कालावधीत पेमेंट न केल्यास त्यावर तुम्हाला व्याज भरावे लागते.

7. तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट जनरेट झाल्यानंतर तुमच्याकडे ते भरण्यासाठी दोन पर्याय असतात. एक म्हणजे किमान देय रक्कम भरता येते किंवा संपूर्ण बिल भरता येते. परंतु कायम पूर्ण रक्कम भरणे तुमच्या फायद्याचे असते. किमान देय रक्कम भरल्यास उर्वरित रकमेवर तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्याज भरावे लागते.

8. क्रेडिट कार्डमध्ये वापरकर्त्यांना पैसे काढण्याची सुविधा देखील दिली जाते. परंतु ते टाळणे कायम चांगले असते. क्रेडिट कार्डमधून रोख पैसे काढण्यावर आकारले जाणारे व्याज सामान्यतः खूप जास्त असते. त्यामुळे असे करणे टाळावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe