Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. दरम्यान, ही वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे.
दरम्यान मुंबईकरांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबईला लवकरच एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिका लवकरच सर्वसामान्यांच्या सेवेत येणार आहे.

या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा आधीच प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे आता दुसरा टप्पा सुद्धा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई मेट्रोमार्ग 3 चा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी या टप्पा 2 अ च्या प्रवासी सेवा सुरु होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दरम्यान आता आपण या मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार ? याबाबत काय अपडेट हाती आली आहे? याविषयी जाणून घेणार आहोत.
कधी सुरू होणार मेट्रो मार्ग 3 चा दुसरा टप्पा ?
खरेतर, नुकतेच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच या मार्गिकेचे लोकार्पण होणार आहे, लोकार्पणानंतर या मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा प्रवाशांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे आणि यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार आहे.
सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, उद्या या मार्गाचे लोकार्पण होणार आहे. शुक्रवार दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गिकेचे उद्घाटन होईल अशी माहिती जाणकार लोकांकडून समोर आली आहे. उद्या या मार्गाचे लोकार्पण होईल आणि त्यानंतर शनिवारपासून बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो सेवा प्रत्यक्ष सुरु होणार आहे.
प्रवासी संख्या वाढणार !
खरंतर मुंबईमधील मेट्रोमार्ग 3 चा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी हा मार्ग आधीच वाहतुकीसाठी सुरु झाला आहे, पण तरीही याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, या मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा सुरु झाल्यानंतर प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होईल, अशी आशा जाणकार लोकांना आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने सुद्धा असाच विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. वास्तविक, गेल्या काही आठवड्यांपासून या टप्प्यावर सीएमआरएसच्या चाचण्या सुरु होत्या, आणि आता त्या यशस्वी झाल्या आहेत. यामुळे लवकरच या मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.