सलग 5व्या दिवशी सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ ! 9 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय ? महाराष्ट्रातील स्थिती कशी आहे?

सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत सातत्याने बदल होतोय. आज चांदीच्या किमतीत थोडी घसरण झाली आहे तर सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज चांदीची किंमत किलोमागे शंभर रुपयांनी कमी झाली. अशा परिस्थितीत आज आपण सोने आणि चांदीच्या लेटेस्ट किमती जाणून घेणार आहोत.  

Published on -

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत सातत्याने बदल होतो. गेल्या महिन्यात सोन्याच्या किमतीने एक नवा रेकॉर्ड स्थापित केला होता. 22 एप्रिल 2025 रोजी सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी झाली होती. यानंतर, मात्र किमतीमध्ये सातत्याने घसरण झाली.

जवळपास तीन-चार मे पर्यंत किमतीत घसरण होत होती. पण आता यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पाच मे 2025 पासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असून पुन्हा एकदा सोने एका लाखाच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे.

किंबहुना सोने एका लाखाच्या टप्प्यात पोहोचले आहे. पाच मे 2025 रोजी सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये एवढी होती, सहा मे रोजी हीच किंमत 98 हजार 460 रुपयांपर्यंत पोहोचली.

7 मे 2025 रोजी किंमत 99 हजार रुपयांवर गेली आणि काल आठ मे रोजी सोन्याची किंमत सहाशे रुपयांनी वाढली. काल 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 600 रुपये प्रति दहा ग्राम एवढी राहिली. दरम्यान आता आपण आज 9 मे 2025 रोजीचे रेट थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

मुंबई : 18 कॅरेट – 74,710 / 10 ग्रॅम , 24 कॅरेट -99,610 / 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 91,310 / 10 ग्रॅम

पुणे : 18 कॅरेट – 74,710 / 10 ग्रॅम , 24 कॅरेट -99,610 / 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 91,310 / 10 ग्रॅम

नागपूर : 18 कॅरेट – 74,710 / 10 ग्रॅम , 24 कॅरेट -99,610 / 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 91,310 / 10 ग्रॅम

ठाणे : 18 कॅरेट – 74,710 / 10 ग्रॅम , 24 कॅरेट -99,610 / 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 91,310 / 10 ग्रॅम

कोल्हापूर : 18 कॅरेट – 74,710 / 10 ग्रॅम , 24 कॅरेट -99,610 / 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 91,310 / 10 ग्रॅम

जळगाव : 18 कॅरेट – 74,710 / 10 ग्रॅम , 24 कॅरेट -99,610 / 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 91,310 / 10 ग्रॅम

नाशिक : 18 कॅरेट – 74,740 / 10 ग्रॅम , 24 कॅरेट -99,640 / 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 91,340 / 10 ग्रॅम

वसई विरार : 18 कॅरेट – 74,740 / 10 ग्रॅम , 24 कॅरेट -99,640 / 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 91,340 / 10 ग्रॅम

लातूर : 18 कॅरेट – 74,740 / 10 ग्रॅम , 24 कॅरेट -99,640 / 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 91,340 / 10 ग्रॅम

भिवंडी : 18 कॅरेट – 74,740 / 10 ग्रॅम , 24 कॅरेट -99,640 / 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 91,340 / 10 ग्रॅम

चांदीच्या किमतीत घसरण

एकीकडे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण सुरू आहे. चांदीची किंमत ही प्रति किलोमागे एका लाखाच्या वर होती.

मात्र आता चांदीची किंमत एका लाखाच्या आत आली आहे. काल चांदीची किंमत 99 हजार रुपये प्रति किलो एवढी होती मात्र आज याची किंमत 98 हजार 900 रुपये प्रति किलो इतकी खाली आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe