घरच्या घरी थिएटरची मजा घ्या ‘या’ टिव्हीवर; Xiaomi ने आणले असे भन्नाट फिचर्सवाले टिव्ही

Published on -

भारतीय बाजारात Xiaomi ने QLED TV FX Pro Series 2025 लाँच केली. या सिरीजमध्ये 43 आणि 55 इंचाच्या टिव्हीचा समावेश आहे. हे टीव्ही Alexa व्हॉइस रिमोट सह Fire TV OS वर चालतात. या टीव्हीमध्ये क्वॉन्टम डॉट टेक्नॉलॉजीसह 4K रेजॉल्यूशन मिळणार आहे. यात 1.07 बिलियन कलर डेप्थ, DCI-P3 वाइड कलर गॅमट आणि HDR10+ला सपोर्ट मिळतो. हा टीव्ही क्वॉड-कोर A55 प्रोसेसर आणि माली-G52 MC1 GPU वर चालतो.

काय आहे टिव्हीची किंमत?

Xiaomi QLED TV FX Pro च्या पहिल्या म्हणजेच 43 इंच माॅडेलची किंमत 27,999 रुपये आहे. तर 55 इंच व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. हा टीव्ही विक्रीसाठी ई-कॉमर्स साइट Amazon, शाओमीच्या ऑफिशियल साइट आणि इतर रिटेल पार्टनरवर 14 मे पासून उपलब्ध होईल. लाँच ऑफर अंतगर्त एचडीएफसी बँक कार्डनं पेमेंट केल्यास 2,000 रुपये डिस्काउंट मिळवता येईल.

काय आहेत टिव्हीची वैशिष्ट्ये?

Xiaomi QLED TV FX Pro 2025 मध्ये 43 इंच आणि 55 इंचाचा 4K QLED डिस्प्ले आहे. रेजोल्यूशन 3840 x 2160 पिक्सल, 178 डिग्री व्यूइंग अँगल, विविड पिक्चर इंजिन 2, 60Hz रिफ्रेश रेट आणि 120Hz गेम बूस्टर आहे. यात फिल्ममेकर मोडचा समावेश करण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये क्वॉड Cortex A55 प्रोसेसर आणि Mali-G52 MC1 GPU देण्यात आला आहे. 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेजही यात देण्यात आले आहे. 43 इंच मॉडेलमध्ये 30W स्पिकर, आणि 55 इंच मॉडेलमध्ये 34W स्पिकर आहे.

काय आहेत अॅडव्हान्स फिचर्स?

फायर टीव्हीमध्ये प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, जियो हॉटस्टार सारखी 12,000 पेक्षा जास्त अ‍ॅप देण्यात आली आहेत. Alexa बटनसह नवीन रिमोट, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन म्यूजिक, अ‍ॅप, इंटरनेट आणि लाइव्हसाठी क्विक अ‍ॅक्सेस मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 802.11 ac, एयरप्ले, मीराकास्ट, ब्लूटूथ 5.0, तीन HDMI 2.0 & 2.1, दोन USB 2.0, 3.5 मिमी ऑडियो जॅक, ईथरनेट आणि दोन अँटीनाचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe