साप किती तास झोप काढतो ? साप रात्री झोपतो की दिवसा ? तज्ञांनी दिली मोठी माहिती

भारतात सापाबाबत वेगवेगळ्या गैरसमज तयार झाले आहेत. दरम्यान आज आपण सापांबाबत एका रंजक गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत. साप एका दिवसात किती तास झोपा काढतो आणि ते दिवसा झोपतात की रात्री याच संदर्भात शास्त्रज्ञांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Published on -

Snake Viral News : साप डोळ्याला दिसला तरीदेखील आपल्याला थंडा घाम येऊ लागतो. आपल्यापैकी कित्येकांना सापांची प्रचंड भीती वाटत असेल. कारण म्हणजे भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो.

एका आकडेवारीनुसार देशात दरवर्षी 86 ते 87 हजार लोक साप चावल्यामुळे मरण पावतात. त्याहून शॉकिंग गोष्ट अशी की भारतात फक्त चार ते पाच सापांच्या अशा जाती आहेत ज्या की प्रचंड विषारी आहेत.

देशात सापाच्या शेकडो प्रजाती आहेत पण त्यापैकी अवघ्या बोटावर मोजण्या इतक्याच जाती विषारी असल्याचे म्हटले जाते. मात्र असे असतानाही देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे सापांची भीती वाटणे स्वाभाविक आहे.

हेच कारण आहे की सापांबाबत जाणून घेण्यात सर्वसामान्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते. दरम्यान आज आपण सापांबाबत अशीच एक रंजक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. साप एका दिवसात किती तास झोपतात? ते रात्री झोपतात की दिवसा? याबाबत तज्ञांकडून देण्यात आलेली महत्त्वाची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

साप किती तास झोपतो ? 

असं म्हणतात की, सांप दिवसाला सरासरी 16 तास झोप घेतात. माणूस एका दिवसात जवळपास सात ते आठ तास झोप घेतो. मात्र साप माणसांच्या तुलनेत दुपटीहुन अधिक वेळ झोपतो. साप आपल्या बिळामध्ये झोपतो.

मात्र जाणकार लोकांनी असेही स्पष्ट केले आहे की सापाच्या झोपेचा कालावधी हा त्यांच्या प्रजातीप्रमाणे व ऋतूप्रमाणे बदलतो. जे विशालकाय साप असतात ते जास्त झोपतात. अजगरसारखे मोठे सांप दिवसाला 18 तासांहून अधिक झोप घेतात,

अशी माहिती देण्यात आली असून त्यातल्या त्यात आशिया, अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील अजगर सर्वाधिक झोपा काढतात असे काही अभ्यासातून समोर आले आहे.

कोणत्या ऋतूमध्ये साप जास्त झोपतात 

सापांच्या झोपेचा कालावधी हा ऋतूप्रमाणे बदलतो. जसे की, थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजेच हिवाळ्यात सांपांची झोप वाढते. थंडीच्या दिवसात साफ सरासरी 20 ते 22 तास झोपतात. थंडीच्या दिवसात साप त्यांच्या हालचाली पूर्ण थांबवतात. या दिवसात अजगर सारखे प्रचंड मोठे साप एखाद्या शिकारीनंतर अनेक दिवस झोपून राहतो, ज्यामुळे त्यांची ऊर्जा टिकून राहते. 

साप दिवसा झोपतो की रात्री?

अनेकजण साप दिवसा झोपतो की रात्री असाही प्रश्न विचारत होते. दरम्यान याबाबत तज्ञांकडून अशी माहिती हवी आहे की जे साप दिवसा शिकार करतात ते रात्री झोपत असतात आणि जे रात्री शिकार करतात ते दिवसा झोपा काढतात.

आपल्याकडे आढळणारा किंग कोब्रा ज्याला आपण नाग म्हणतो तो साप दिवसा जास्त झोपत असतो. पण साप दिवसा झोपो किंवा रात्री जेव्हा त्याची झोप पूर्ण होते तेव्हा तो अधिक सक्रिय बनत असतो. झोप पूर्ण झाल्यानंतर किंग कोबरा साप 3.33 मीटर प्रति सेकंद वेगाने हालचाल करू शकतो.

शास्त्रज्ञ सांगतात की, अभ्यासातून असे समोर आले आहे की झोपेदरम्यान सांपांची हृदयगती व श्वासक्रिया मंदावत असते. तसेच अन्न घेतल्यानंतर 20 तासांनी सापांना अधिक झोप लागत असते. करैत, नाग, कोबरा हे भारतात आढळणारे विषारी साप रात्री अधिक सक्रिय होतात. रात्री 12 ते 4 या वेळेत हे विषारी साप अधिक सक्रिय असतात, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News