Railway प्रवाशांसाठी गुड न्यूज ! नागपूर रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी चालवली जाणार एक्सप्रेस ट्रेन, पहा….

Published on -

Maharashtra Railway : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत आणि यामुळे अनेकजण आपल्या मुळ गावाकडे रवाना होत आहेत. तसेच काहीजण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांची तुंबळ गर्दी पाहायला मिळत आहे.

दरम्यान याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या उपराजधानीमधून अर्थातच नागपूर रेल्वे स्थानकावरून एक विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर ते गया दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती रेल्वे कडून समोर आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस असणार वेळापत्रक? 

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ते बिहार राज्यातील गया या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकादरम्यान चालवल्या जाणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनला येत्या दहा तारखेपासून चालवले जाणार आहे. शनिवार, १० मेपासून ही गाडी सुरू होणार अशी बातमी समोर आली असून यामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या विशेष एक्सप्रेस ट्रेन च्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर नागपूर गया स्पेशल गाडी (गाडी क्रमांक ०१२०३) १० मे रोजी दुपारी ३:४० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ मे रोजी रात्री ११:४५ वाजता गया येथे पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गया नागपुर स्पेशल गाडी म्हणजेच ( गाडी क्रमांक ०१२०४ ) मंगळवारी १३ मे रोजी रात्री साडेआठ वाजता गया रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि गुरुवारी ३:५० वाजता नागपूरला पोहोचणार आहे.

नक्कीच या विशेष एक्सप्रेस ट्रेन मुळे नागपूर ते गया दरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही. खरे तर उत्तर भारतातील असंख्य लोक उपराजधानी नागपूर येथे कामानिमित्ताने स्थायिक झाले आहेत. यामुळे या लोकांसाठी ही गाडी सर्वाधिक फायद्याची ठरणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष गाडी 

 रेल्वे कडून सुरु करण्यात आलेल्या नागपूर गया विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील नरखेड, पांढूर्णा, आमला, बैतूल, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिक्की, मिर्झापूर,

पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, भभूआ रोड, सासाराम, डेहरी ऑन सोन या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबेल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. दुसरीकडे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी सुरू केल्या जाणाऱ्या या विशेष गाडीला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दाखवावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News