विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, संपूर्ण राज्यात एकाच वेळी परीक्षा होणार, कस आहे वेळापत्रक ?

तुम्हीही टायपिंगचे क्लासेस लावले आहेत का? अहो मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. टायपिंगची परीक्षा कधी होणार? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात होता दरम्यान आता टायपिंगच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Typing Exam : क्लर्क म्हणजेच लिपिक पदाची नोकरी मिळवायची असेल तर टायपिंगचे सर्टिफिकेट लागते. मराठी तसेच इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट शिवाय महाराष्ट्रात लिपिक पदाची नोकरी मिळवता येत नाही.

यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी टायपिंगची परीक्षा देतात. दरम्यान जर तुम्हीही टायपिंगच्या सर्टिफिकेट परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे GCC-TBC याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

या वेळापत्रकानुसार पुढील महिन्यात टायपिंगची परीक्षा घेतली जाणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जात असते आणि यंदाही संपूर्ण राज्यात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान आता आपण टायपिंगच्या परीक्षेचे वेळापत्रक नेमके कसे आहे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक 

पुढील महिन्याच्या अकरा तारखेपासून टायपिंगच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. ११ जून २०२५ पासून राज्यभरातील १७५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील (३० व ४० शब्द प्रति मिनिट) टायपिंगच्या परीक्षा ११ जून पासून सुरु होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यासाठी चे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच www.mscepune.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहेत.

विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट संस्थांच्या लॉगिनद्वारे मिळणार आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांनी ज्या संस्थेकडे टायपिंगचे क्लासेस लावलेले असतील तिथे जाऊन विद्यार्थ्यांना आपले हॉल तिकीट प्राप्त करता येणार आहे. 

विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हॉल तिकीट काढून घ्यावे 

 आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक संगणक टंकलेखन संस्थाचालकांनी आपल्या संस्थेतील परीक्षार्थ्यांची हॉल तिकीट संकेतस्थळावरून डाउनलोड करून संबंधित परीक्षार्थींना वितरित करावीत असे आवाहन करण्यात आले आहे. हॉल तिकीटवर विद्यार्थ्यांचा अद्यावत फोटो, संस्थेचा शिक्का व स्वाक्षरी करूनच संबंधित संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायला हवेत असे सुद्धा आवाहन यावेळी करण्यात आले आहे. 

हॉल तिकीटमधील स्पेलिंगमध्ये दुरुस्ती करता येणार 

प्रवेशपत्र वितरीत केल्यानंतर अनेकदा विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव किंवा पालकांचे नाव चुकीचे आढळते. काही प्रकरणात तर विद्यार्थ्यांचा फोटोच मॅच होत नाही.

मात्र परिषदेच्या माध्यमातून हॉल तिकीट वितरित झाल्यानंतर परीक्षार्थीचे नाव, आडनाव, पालकांचे नाव, फोटो आदी कोणत्याही माहितीमध्ये बदल करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

फक्त, हॉल तिकीट वरील नावांच्या स्पेलिंगमध्ये दुरुस्ती करायची असल्यास परीक्षार्थींना ती दुरुस्ती करता येणार आहे मात्र यासाठी दोनशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून टायपिंगची परीक्षा नेमकी कधी सुरू होणार असा सवाल परीक्षा आर्थिक कडून केला जात होता.

दरम्यान आता टायपिंगच्या परीक्षेला पुढील महिन्यात सुरुवात होणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या तयारीला अंतिम रूप द्यावे असे जाणकारांचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News