महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार 2 मोठे आर्थिक लाभ, आठव्या वेतन आयोगाआधीच पगार वाढणार !

राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी गुड न्यूज मिळणार आहे. येत्या दोन महिन्यांनी म्हणजेच जुलै महिन्यात आणि आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दुहेरी आर्थिक लाभ दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे.

Published on -

Maharashtra State Employee : सध्या देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. खरे तर आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल. या नव्या वेतन आयोगाचा देशातील लाखो कार्यरत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना फायदा होणार आहे.

मात्र सुरुवातीला नवा वेतन आयोग फक्त आणि फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होईल आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने विविध राज्यांमधील राज्य शासनाच्या माध्यमातून नव्या वेतना आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातील.

मात्र नवीन वेतन आयोग लागू होण्याआधीच महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार पुन्हा एकदा वाढणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्या मान्य होतील आणि यामुळे त्यांच्या पगारात वाढ होईल अशी आशा आहे.

जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढीची भेट

सध्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आधी हा भत्ता 50% एवढा होता मात्र जुलै 2024 पासून हा भत्ता 53% एवढा करण्यात आला आहे. म्हणजेच गेल्या वेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढला आहे.

तिकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून 55% एवढा झाला आहे, म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढलेला आहे.

केंद्रातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलेला असल्याने विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55% केला जात आहे. मात्र अजून राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता काही सुधारित झालेला नाही.

पण जुलै महिन्यात हा भत्ता देखील सुधारित होणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून 55 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहणार असून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे.

वार्षिक वेतन वाढीचा पण लाभ मिळणार 

याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढीचा सुद्धा लाभ जुलै महिन्यातच वितरित केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ मिळते आणि यंदाही जुलै महिन्यातच ही वाढ लागू केली जाईल.

म्हणजे जुलै महिन्यात राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता असे दुहेरी आर्थिक लाभ मिळतील यामुळे त्यांचा पगार चांगलाच वाढेल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News