‘या’ तारखेला महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढणार, समोर आली मोठी अपडेट

मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित झाल्यानंतर आता राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवला जाणार आहे. राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चक्क सात टक्क्यांनी वाढणार असून यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Published on -

DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के एवढा सुधारित करण्यात आला आहे.

महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली असून यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडू यांसारख्या असंख्य राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात आला आहे.

तथापि, अजून महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 53% एवढाच आहे. मात्र येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील सुधारित होईल अशी आशा आहे.

राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 53 टक्क्यावरून 55% एवढा होणार असून ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू केली जाईल अशी माहिती समोर आली आहे. साधारणता जून महिन्यात याबाबतचा निर्णय होईल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.

अशातच आता महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी माहिती फडणवीस सरकारमधील परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आली आहे.

कधी वाढणार एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितल्याप्रमाणे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या चालू महिन्यात म्हणजेच मे महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवला जाणार आहे. सध्या स्थितीला एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.

सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता मिळतोय, मात्र एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना अजूनही 46% दरानेच महागाई भत्ता दिला जात आहे. पण आता राज्य कर्मचाऱ्यांच्या धरतीवर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढणार अशी घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली. या घोषणेनंतर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळत असून या घोषणेचे स्वागत करण्यात आले आहे

किती वाढणार DA?

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा राज्य कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 53% इतका केला जाणार आहे. म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 53% एवढा होईल. म्हणजेच एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सात टक्क्यांनी वाढणार असून या निर्णयाचा त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता सुद्धा मंत्रिमहोदयांकडून व्यक्त करण्यात आली आहे. महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 53 टक्के करावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि या मागणीचा सरकार गांभीर्याने विचार करत असून लवकरच त्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News