उन्हाळ्यात लोक पंखा, कुलर आणि एसीचा वापर करतात. त्यातल्या त्यात एसीच्या किंमती कमी झाल्यामुळे किंवा एसीही अगदी हप्त्यावर मिळत असल्याने अनेकांनी यंदाच्या उन्हाळ्यात एसीलाच पसंतील दिलेली दिसते.
परंतु एसी वापरताना सर्वात मोठा प्रश्न असतो तो विजबिलाचा. कारण एसीचे विजबिल हे सामान्यांना परवडणारे नसते. म्हणून एसी वापरताना काही सोप्या आणि प्रभावी टिप्स लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

एसी घेताना काय काळजी घ्याल?
1. एसी नेहमी 5 स्टार रेटिंग असलेला घ्या. कारण तो कमी विजेचा वापर करतो. यामुळे तुमचं विजेचं बिल कमी येण्यास मदत होते.
2. एसी चालू करता, तेव्हा पंखा देखील सोबत चालू ठेवा. एसी एकटा रूम थंड करण्यास वेळ घेतो. पण एसीसोबत पंखा चालू असल्यास, रुम लवकर थंड होते.
3. रात्री एसी चालू ठेवल्याने विजबील वाढते. त्यामुळे झोपण्यापूर्वी एसीचा टाइमर सेट करावा.
4. एसीची वेळोवेळी सर्विसिंग करणे आवश्यक आहे. यामुळे एसी चांगल्या प्रकारे काम करतो.
कोणता एसी खरेदी करावा?
1. रेटिंग आणि ऊर्जा बचत- एसी खरेदी करताना त्याचे ऊर्जा बचत रेटिंग तपासा. फाइव्ह स्टार रेटिंग असलेला एसी जास्त ऊर्जा बचत करतो.
2. स्ट्रोक आणि क्षमता- एसीचा स्ट्रोक आणि क्षमता तुमच्या रूमच्या आकारानुसार असावा. लहान रूमसाठी १ टन किंवा १.५ टन क्षमता असलेला एसी पुरेसा असतो.
3. ब्रँड आणि विश्वसनीयता- एसी घेताना प्रसिद्ध आणि विश्वासार्ह ब्रँड निवडा. त्या ब्रँडचा सर्व्हिस नेटवर्क आणि इन्शुरन्स देखील तपासा.
4. एसीचा आवाज- एसी चालू असताना आवाज जास्त होत नाही याची खात्री करा. आवाज कमी असलेला एसी निवडा.
5. तापमान आणि हवेची गती – एसीमध्ये तापमान सेट करण्याची सोय आणि हवा फेकण्याची गती देखील महत्त्वाची आहे. काही एसीमध्ये ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण असते, जे ऊर्जा बचत करण्यास मदत करते.