इलेक्ट्राॅनिक्स प्रोडक्ट कोणतेही असो, सध्या Apple ला चांगलंच मार्केट आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हास फिचर्स वापरुन या कंपनीने जगभरात आपला स्वतःचा एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. Apple कंपनीची प्रॉडक्ट्स ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. Apple चे प्रोडक्ट जगभरात लोकप्रिय असले तरी, या कंपनीचा आयफोन सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहेत. या कंपनीच्या अनेक प्रोडक्टमध्ये आय हे चिन्ह वापरले जाते. परंतु या चिन्ह कशासाठी वापरले जाते, हे अनेकांना माहित नाही.
काय आहे ‘आय’चा अर्थ?
“i” चे फक्त एक अक्षर नाही. या आयचे 5 वेगवेगळे अर्थ आहेत. i म्हणजे इंटरनेट असा अर्थ अनेकजण काढतात. तो एका अर्थी बरोबर आहे. परंतु इंटरनेटशिवाय इंस्ट्रक्ट, इंडीव्हिजुयल, इंस्पायर, आणि इंफॉर्म असे आणखी अर्थ या शब्दाचे होत आहेत.

काय होता उद्देश?
अँप्पल कंपनीचा पहिला आयमॅक 1998 मध्ये काढला गेला. या आयमॅकच्या लाँचिंग दरम्यान स्टीव्ह जॉब्सने जगाला I अक्षराचा खरा अर्थ सांगितला होता. i चा कोणताही अधिकृत अर्थ नाही, असं त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. स्टीव्ह जॉब्सने ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना कंपनीची मूल्ये सांगण्यासाठी हा शब्द वापरला होता. हे अक्षर Instruction आणि personal pronoun होते.
कंपनीची धोरणे बदलली
या कंपनीने गेल्या 26 वर्षांत आपल्या धोरणात अनेक बदल केले. काही प्रोडक्टमधून त्यांनी आय हा शब्द काढूनही टाकला. सध्या फक्त आयफोन व आयपॅड या दोन प्रोडक्टमध्ये आय हे अक्षर वापरले जाते. कंपनीने यापूर्वी आयमॅक व आयपाँडच्या नावामधून आय हे अक्षर काढून टाकले आहे. या दोन प्रोडक्टमधून ही अक्षरे का काढून टाकली हे मात्र समजले नाही, परंतु तो कंपनीच्या धोरणाचा एक भाग होता.