Motorola कंपनीने आपली Edge 60 सिरीज भारतात लाँन्च केली. त्यापूर्वी कंपनीने त्यांचे Edge 50 सिरीजच्या फोनची किंमत कमी केली. या संधीचा फायदा घेऊन महाकाय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या लाखो ग्राहकांना या फोनसाठी मोठी ऑफर्सही दिली. फ्लिपकार्टने त्यांच्या SASA LELE सेल अंतर्गत हा फोन फक्त 10 हजार रुपयांना विकला. हा सेल 10 मे पर्यंत सुरु होता.
सेलची तारीख वाढवली
फ्लिपकार्ट SASA LELE सेल हा यापूर्वी 8 मे 2025 पर्यंत सुरु होता. तो दोन दिवसांसाठी वाढवण्यात आला. या सेलमध्ये फ्लिपकार्ट ग्राहकांना स्मार्टफोन, घरगुती उपकरणे, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससह अनेक श्रेणींमध्ये उत्तम डील दिली.

मोटोरोला एज ५० च्या किमतीत कपात
फ्लिपकार्टने सेल ऑफरमध्ये मोटोरोला Edge 50 हा 256 जीबीची किंमत मोठ्या प्रमाणात कमी केली होती. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 32,999 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध आहे. सासा लेले सेल ऑफरमध्ये, कंपनी त्यावर थेट 33% सूट दिली होती. ऑफरसह तुम्ही हा प्रीमियम फोन फक्त 21,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकत होते. याचा अर्थ असा की फ्लिपकार्ट ग्राहकांना थेट 11,000 रुपये वाचवण्याची संधी देत होते.
काय आहेत फोनची वैशिष्ट्ये
– मोटोरोला Edge 50 मध्ये अॅल्युमिनियम फ्रेम डिझाइनसह इको लेदर बॅक फिनिश आहे.
– हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह सुसज्ज आहे. जो तो पाणी आणि धूळपासून सुरक्षित ठेवतो.
– यामध्ये कंपनीने 6.7 इंचाचा P-OLED डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.
– हा स्मार्टफोन अँड्रॉइड 14 वर चालतो जो अपग्रेड करता येतो.
– कंपनीने या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरल 1 एई चिपसेट दिला आहे.
– मोटोरोला Edge 50 मध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज पर्याय आहेत.
– त्याच्या मागील बाजूस 50 + 10 + 13 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
– सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
– मोटोरोला Edge 50 ला पॉवर देण्यासाठी, 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.