सावधान! तुम्ही घरच्या घरी दाढी करता का? मग अगोदर ही बातमी नक्की वाचा

Published on -

कोरोना काळानंतर अनेकजण घरच्या घरीच दाढी करण्याकडे वळले आहेत. परंतु घरीच दाढी करण्यासाठी काही नियमही पाळावे लागतात. त्याचा रेझर ठराविक दिवसांनंतर बदलावा लागतो. एकच रेझर जास्त वेळ वापरल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही किती दिवसांनी रेझर बदलावा…

रेझर किती वेळा बदलावेत?

अमेरिकन अकादमी ऑफ डर्मेटोलॉजीने याबाबत एक माहिती दिली आहे. त्यांच्या म्हण्यानुसार, 5 ते 7 वेळा शेव्ह केल्यानंतर रेझर बदलणे आवश्यक आहे. तुम्ही वेगळे ब्लेड लावून रेझर वापरत असाल, तर प्रत्येक दाढी केल्यानंतर ब्लेड बदलले पाहिजे. असे केल्याने बॅक्टेरिया पसरण्याचा आणि चिडचिड होण्याचा धोका कमी होतो. जर ब्लेडवर कचरा किंवा जास्त धूळ साचली असेल तर रेझर बदलणे चांगले असते.

ब्लेडचे प्रकार किती?

डिस्पोजेबल, कार्ट्रिज किंवा सेफ्टी रेझर असे ब्लेडचे तीन प्रकार अशतात. कार्ट्रिज रेझर पाच ते सात वेळा बदलावा. डिस्पोजेबल रेझर दोन-तीन वापरानंतर बदलावा. तसेच सुरक्षित रेझन तीन ते पा वेळा दाढी केल्यानंतर बदलावा. तसेच तुमची त्वचा किंवा दाढीच्या केसांचा प्रकार यावरही ब्लेड किती वेळा बदलायचा ते ठरते. याशिवाय तुम्ही आठवड्यात किती वेळा दाढी करता यावरही ब्लेडचे आयुष्य ठरते.

डाॅक्टर काय म्हणतात?

दाढी करताना जळजळ होत असेल, केस निट कापले जात नसतील, तर ब्लेडची धार कमी झाल्याचे द्योतक आहे. त्याने तुमच्या त्वचेला नुकसानही पोहचू शकते. त्यामुळे वेळीच ब्लेड बदलणे चांगले असते. शिवाय एकच ब्लेड काहींना दोनदा सुट होत नाही. अशावेळी ते ब्लेड बदलणे चांगले असे डाँक्टरांचे म्हणणे आहे.

कोणते रेझर वापरावे?

सध्या बाजारात कित्येक प्रकारचे रेझर मिळते. परंतु आपल्या त्वचेला सुट होणारे रेझर कायम वापरावे, असा सल्ला दिला जातो. खराब किंवा जुन्या रेझरमुळे संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. रेझर स्वच्छ केल्यानंतर त्याचा वापर करायला हवा. चांगल्या कंपनीचाच रेझर वापरावे जेणेकरुन त्वचेला नुकसान होणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News