महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाले नवीन बसस्थानक ! 17 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च, कस आहे नवीन स्थानक ?

राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील दक्षिण कोकणात एक नवीन बस स्थानक तयार करण्यात आले आहे. काल याचे लोकार्पण देखील झाले आहे अन ही बसस्थानकाची नूतन इमारत आजपासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार आहे.

Published on -

Maharashtra Bus Stand : महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी एसटी महामंडळाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्यातील एका महत्त्वाच्या शहरात नवीन मध्यवर्ती बस स्थानक तयार करण्यात आले आहे.

दक्षिण कोकणात हे नवीन बसस्थानक तयार करण्यात आले असून या नव्या बसस्थानकामुळे दक्षिण कोकणातील यशस्वी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी शहरात हे नवीन बसस्थानक तयार करण्यात आले असून यामुळे शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.

17 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च

रत्नागिरी बसस्थानकाबाबत बोलायचं झालं तर या मध्यवर्ती बस स्थानकाच्या कामासाठी एकूण 17 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. याचे काम गेल्या महिन्यातच पूर्ण झाले असून याचे लोकार्पण काल अर्थातच 11 मे 2025 रोजी पूर्ण झाले. लोकार्पणानंतर आता हे बस स्थानक सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.

यामुळे रत्नागिरी बसस्थानकातून यजा करणारे एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या बसस्थानकाचे काम संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या सव्वा वर्षाच्या काळात पूर्ण केले आहे. मात्र त्याआधी हा प्रकल्प जवळपास पाच वर्षे रखडला होता.

पण या प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातून अवघ्या सव्वा वर्षात हे काम पूर्णत्वास नेले गेले आणि कालअखेर हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. यामुळे सध्या रत्नागिरी शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

रत्नागिरीच्या या बसस्थानकासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी मोठे शर्तीचे प्रयत्न केलेत आणि याच उभय नेत्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने रत्नागिरी येथे हे भव्य मध्यवर्ती बस स्थानक तयार झाले.

नवीन बसस्थानकाचे लोकार्पण झाले 

रत्नागिरी येथील नवीन मध्यवर्ती बस स्थानक 17 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विशेष निधीतून हे नवे बसस्थानक विकसित झाले आहे. दरम्यान रत्नागिरी मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण काल 11 मे 2025 रोजी फीत कापून आणि कोनशिला अनावरण करून करण्यात आले आहे.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत हे उपस्थित होते. उद्या सामंत यांनी या नव्या वास्तूला ‘आपले घर’ असं संबोधल अन त्याची स्वच्छता आणि देखभाल राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे आवाहन सुद्धा केले. 

कसे आहे नवीन बस स्थानक?

शहराच्या या नव्या बसस्थानकाबाबत बोलायचं झालं तर याच्या तळ माळ्यावरून शहरी बससेवा चालवली जाणार असल्याची माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे. तर दुसरीकडे पहिल्या माळ्यावरून मुंबई-पुण्यासारख्या शहरांसाठी बसेस चालवल्या जाणार आहेत. याशिवाय पहिल्या माळ्यावरून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा बसेस सोडल्या जातील असे संबंधितांनी यावेळी सांगितले आहे.

याच्या तळमाळ्यावर 18 आणि पहिल्या माळ्यावर 6 गाळे आहेत. या नव्या बसस्थानकात दोन कँटिन, दोन पोलिस चौक्या, दोन आरक्षण खिडक्या, दोन स्वच्छतागृहांसह विश्रांतीगृह, पार्सल आणि कंट्रोल रूमची व्यवस्था सुद्धा करून देण्यात आली आहे. यामुळे येथील एसटी प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News