विद्यार्थ्यांनो, 13 मे ला 10वी चा निकाल लागणार, ‘या’ तारखेपासून गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार !

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. 13 मे 2025 रोजी शार्प एक वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज कधीपासून करता येणार ? हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात होता आणि आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे.

Published on -

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीचा निकाल नेमका कधी लागणार हा प्रश्न? विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जातोये. दरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून आता दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे.

खरे तर बारावी बोर्डाचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून उच्च शिक्षणासाठी कॉलेजेसचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे आता उद्या म्हणजेच 13 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएससी म्हणजेच दहावीच्या वर्गाचा निकाल उद्या एक वाजता जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता आता संपणार आहे. तथापि निकाल काय लागतो? या विचाराने विद्यार्थ्यांची धडधड मात्र वाढलेली आहे.

पण बहुतांशी विद्यार्थी परीक्षा छान गेली असल्याने निकाल सुद्धा चांगला लागेल असा विश्वास व्यक्त करत आहेत आणि त्यांना निकालाची उत्सुकता आहे. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर गुण पडताळणी आणि उत्तर पत्रिकांच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार असून ही प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याबाबत देखील बोर्डाकडून मोठी माहिती देण्यात आली आहे. 

निकाल किती वाजता पाहता येणार ?

महाराष्ट्र राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल जाहीर होण्याआधीच यावेळी दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे निकाल 15 मे 2025 च्या आधी जाहीर केले जातील अशी माहिती दिली होती. यानुसार बारावी बोर्डाचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर उद्या अर्थातच 13 मे रोजी आता दहावीचा निकाल लागणार आहे.

13 मे 2025 रोजी सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल सुद्धा पाहता येईल.

गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी या तारखेपासून अर्ज करता येणार ! 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बोर्डाने विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी तत्काळ अर्ज करता येणार असल्याची माहिती दिली आहे. पण, यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत साइटवर अर्ज करावा लागणार आहे.

https://mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल अशी माहिती जाणकारांकडून मिळाली आहे. संबंधितांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुण पडताळणी आणि उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करायचा झाल्यास विद्यार्थ्यांना 14 मे 2025 ते 28 मे 2025 पर्यंत अर्ज सादर करता येईल.

मात्र यासाठी विद्यार्थ्यांना काही शुल्क सुद्धा भरावे लागणार आहे आणि हे शुल्क विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. विद्यार्थ्यांना डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून या जातीचे शुल्क भरता येईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

पण, पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे, जेव्हा विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेची छायाप्रत मिळेल तेव्हाच त्यांना विहित नमुन्यात अर्ज सादर करता येणार आहे आणि हा अर्ज छायाप्रत मिळाल्यानंतर पाच (कामकाज) दिवसात सादर सुद्धा करावा लागणार आहे.

हा सुद्धा अर्ज विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे. दरम्यान, पुनर्मूल्यांकनासाठी ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्या विभागीय मंडळाशी संपर्क साधणे आवश्यक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News