महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी आत्ताची सर्वात महत्वाची बातमी ! उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. माननीय उच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी घेतली असून यामुळे राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Published on -

Maharashtra Primary Teacher : येत्या 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची 15 जून 2025 पासून सुरुवात होणार असून प्रत्यक्षात 16 जून 2025 पासून शाळा सुरू होतील. पण 9 शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

खरेतर, ही बातमी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा शिक्षक बदलीच्या संदर्भात आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकांची बदली प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून रखडली होती आणि यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती.

पण, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाकडून राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी दिलासायक निकाल जाहीर करण्यात आला असल्याने प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांचा न्यायालयीन मार्ग मोकळा झाला आहे.

उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी! 

राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांचा न्यायालयीन मार्ग मोकळा झाला आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल याचिकेवर काल तीन-चार दिवसांपूर्वी एक महत्त्वाची सुनावणी झाली. 9 मे 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर खंडपीठात ही सुनावणी झाली असून या सुनावणीत माननीय न्यायालयाने राज्य शासनाच्या एका महत्त्वाच्या शासन निर्णयाला रद्द केले आहे.

28 मार्च 2025 रोजी राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकाला माननीय न्यायालयाकडून रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून याचिका थेट निकाली काढण्यात आली आहे.

या निर्णया अंतर्गत आता राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या परस्पर आंतरजिल्हा बदल्यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, अशा बदल्यांनंतर नवीन जिल्ह्यातील सेवाही वरिष्ठतेसाठी ग्राह्य धरावी, असा स्पष्ट निर्णय खंडपीठाने यावेळी दिला आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला आहे असं आपण म्हणू शकतो. 

नवीन बदल्यांचे वेळापत्रक या तारखेला पोर्टलवर अपलोड 

माननीय उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना अंतर्गत बदल्यांसाठी नव्याने संधी मिळणार आहे. पोर्टलवरील तांत्रिक स्थगिती हटवल्याने आता शिक्षकांना आपले सेवा व वरिष्ठतेचे तपशील अद्ययावत करता येणार असे सांगितले गेले आहे.

तसेच, गटशिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे व्हेरिफिकेशन तीन ते चार दिवसांत अपेक्षित आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. दरम्यान नवीन बदल्यांचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या नवीन बदल्यांचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांनी जाहीर होण्याची शक्यता आहे हे वेळापत्रक 15 मे ते 16 जूनदरम्यान जाहीर होईल असा अंदाज आहे. पण हे टाईम टेबल शासनाच्या अधिकृत सूचनेनंतर पोर्टलवर अपडेट होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!