SBI News : स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी विविध कालावधीच्या एफडी योजना ऑफर केल्या जात आहेत. या बँकेकडून ग्राहकांसाठी बारा महिन्यांची म्हणजेच एका वर्षाची एफडी योजना सुद्धा ऑफर केले जाते.
दरम्यान जर तुम्हाला शॉर्ट टर्म एफडी प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्यासाठी एसबीआय चा पर्याय बेस्ट ठरणार आहे. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट साठी एसबीआय ची एका वर्षाची एफडी योजना बेस्ट ठरते.

खरंतर गेल्या काही महिन्यांच्या काळात आरबीआय कडून रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आरबीआय कडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली होती.
यानंतर या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देखील आरबीआयने रेपो रेट मध्ये तेवढीच कपात केली. म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या रेपो रेट मधील कपाती नंतर आता सुधारित रेपो रेट सहा टक्के एवढा झाला आहे.
दरम्यान रेपोरेट मध्ये कपात करण्यात आल्यानंतर देशभरातील विविध बँकांच्या माध्यमातून होम लोन सहित विविध प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. विविध बँकांनी एफडी व्याजदरात सुद्धा कपात केलेली आहे.
एसबीआय कडूनही होम लोन च्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे आणि एफडी व्याजदरात देखील एसबीआयने कपात केली आहे. मात्र असे असले तरी आजही एसबीआय ची एका वर्षाची एफडी योजना ग्राहकांसाठी फायद्याची ठरते.
कशी आहे एसबीआयची एका वर्षाची एफडी योजना?
स्टेट बँक ऑफ इंडिया एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 3.50% पासून 7.55 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न देत आहे. एसबीआय कडून सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जाते.
एसबीआय कडून बारा महिन्यांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.70% दराने व्याज दिले जात आहे, तसेच याच कालावधीच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना एसबीआय कडून 7.20% दराने व्याज दिले जात आहे.
यामुळे एसबीआयची बारा महिन्यांची एफडी योजना ग्राहकांसाठी फायद्याची ठरते, विशेषता जेष्ठ नागरिक ग्राहकांसाठी ही योजना अधिक लाभाची ठरत आहे.
तीन लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
एसबीआयच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेत तीन लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास सामान्य गुंतवणूकदारांना म्हणजेच साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या नागरिकांना तीन लाख वीस हजार 610 मिळतात.
अर्थातच सामान्य ग्राहकांना बारा महिन्यांच्या एफडी योजनेत तीन लाखाची गुंतवणूक केल्यास वीस हजार 610 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतात.
जर समजा बारा महिन्यांच्या एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांनी म्हणजेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ग्राहकांनी तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 7.20% दराने तीन लाख 22 हजार 190 रुपये मिळतात म्हणजेच जेष्ठ नागरिक ग्राहकांना या योजनेतून 22,190 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळतात.