प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली कायम चर्चेत असतो. जसा विराट चर्चेत असतो तशीच त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही चर्चत असते. हे दोघेही आपापल्या क्षेत्रात चांगलेच लोकप्रिय आहेत. अनुष्का आपल्या अभिनयाच्या जोरावर, तर विराट आपल्या खेळाच्या जोरावर कायम टाॅप परफाँर्मन्स देत असतात. परंतु एका बाबतीत मात्र अनुष्का शर्मा विराट कोहलीपेक्षा खूप पुढे आहे.
अनुष्का विराटपेक्षा हुशार
शिक्षणाचा विचार केला तर, विराट अनुष्का शर्मापुढे झीरो आहे. शिक्षणाच्या बाबतीत या जोडप्यात जमीन-आस्मानचा फरक आहे. या दोघांच्या शिक्षणाच्या चर्चा अनेकदा रंगतात. विराट क्रिकेटचा जरी बादशहा असला तरी तो शिक्षणाच्या बाबतीत मात्र आपल्या बायकोपेक्षा खूप मागे आहे.

किती शिकलाय विराट?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीने विशाल भारती पब्लिक स्कूलमधून 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. 1998 मध्ये विराट कोहली पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये सामील झाला आणि त्याने पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. त्याचे गणित आणि विज्ञान शिक्षक अजूनही त्याला एक हुशार आणि हुशार विद्यार्थी मानतात.
किती शिकलीय अनुष्का?
अनुष्काने कला विषयात बॅचलर पदवी आणि अर्थशास्त्रात मास्टर्स पदवी प्राप्त केली आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले होते की, “मी शाळा आणि कॉलेजमध्ये टॉपर असायचो. मला माहित होते की मला मॉडेलिंग करायचे आहे. मॉडेलिंग करण्याची इच्छा असूनही, मी माझे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करू इच्छित होतो. लोक माझ्या पालकांना सांगायचे, तुमच्या मुलीने मॉडेलिंग करायला सुरुवात केली आहे? तर माझे पालक सांगायचे की, ती शाळेतही टॉपर राहिली आहे.