FYJC Admission : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची चर्चा सुरू होती तो निकाल काल अर्थातच तेरा मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असल्याने आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होणार आहे.
दरम्यान अकरावीला प्रवेश देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एफ वाय जे सी अर्थातच अकरावीला दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रवेश घेत असतात. 11वी आर्ट, कॉमर्स आणि सायन्सला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना दहा कॉलेज निवडता येणार
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अकरावीला ऍडमिशन घेता येणार आहे. दरम्यान यंदा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज करताना एकूण 10 कॉलेज निवडता येणार अशी माहिती देण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार 10 कॉलेज निवडावे लागणार आहे. दरम्यान या पसंती क्रमांक निवडलेल्या कॉलेजमध्ये मेरिटनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे.
या आधी फक्त शहरी भागातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होती मात्र आता ग्रामीण भागातील प्रवेश प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन झाली आहे आणि यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून संकेतस्थळ सुद्धा जारी करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज करण्यासाठी https://mahafyjcadmissions.in हे नवीन संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ही कागदपत्रे लागणार
विद्यार्थ्यांना अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता सुद्धा करावी लागणार आहे. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना आणि दोन विषय राहिलेल्या आणि H असा शेरा असणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे शिक्षण विभागाने यंदा पहिल्यांदाच विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली आहे. अकरावीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना सहा कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
अकरावीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच शाळा सोडल्याचा ओरिजिनल दाखला (LC) लागणार आहे याशिवाय ओरिजिनल मार्कशीट सुद्धा लागेल. तसेच आधारकार्ड (छायांकित प्रत), दोन पासपोर्ट साईज फोटो (1 एमबी साईज) सुद्धा द्यावे लागणार आहेत.
जे विद्यार्थी एस सी, एस टी, एन टी, OBC अशा प्रवर्गातून ऍडमिशन घेणार आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला सुद्धा द्यावा लागेल. याशिवाय आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजेच ईडब्ल्यूएस कोट्यातून अर्ज करणार आहेत त्यांना तहसीलदारांकडून देण्यात आलेला उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागणार आहे.