पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील ‘या’ 5 रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर

पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे कडून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एक अतिरिक्त समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. दरम्यान आज आपण पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

Published on -

Pune Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्रातील आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेकडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

रेल्वे कडून चालवली जाणारी ही नवीन गाडी बेंगलोर ते गोरखपुर दरम्यान चालवली जाणार आहे, ही नव्याने सुरू केली जाणारी एक्सप्रेस ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे आणि राज्यातील जवळपास पाच महत्त्वाच्या स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. 

अशा परिस्थितीत आज आपण बेंगलोर गोरखपूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक ? 

बेंगलोर ते गोरखपुर या मार्गावर उन्हाळी सुट्ट्या असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या मार्गावरील गाड्या पूर्णपणे हाउसफुल धावत आहेत.

त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता अतिरिक्त रेल्वे गाडी चालवली गेली पाहिजे अशी प्रवाशांची मागणी होती आणि याच मागणीच्या अनुषंगाने रेल्वे कडून बंगलोर ते गोरखपुर दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ही समर स्पेशल ट्रेन राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमधून धावणार आहे. पुणे जिल्ह्यातूनही ही गाडी धावेल आणि यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर बंगळुरू गोरखपूर समर स्पेशल ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 06529 ही रेल्वेगाडी 12, 19 आणि 26 मे 2025 रोजी बंगळुरू येथील सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल येथून सोडली जाणार आहे.

तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 06530 ही गोरखपुर बेंगळुरू समर स्पेशल ट्रेन 16, 23 आणि 30 मे 2025 रोजी गोरखपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

ही ट्रेन पुणे मार्गे धावणार आहे यामुळे पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळेल. ही गाडी पुण्यासहित पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. 

कुठे कुठे थांबणार नवीन समर स्पेशल ट्रेन 

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष एक्सप्रेस ट्रेनला भुसावळ, मनमाड, दौंड, पुणे, मिरज या राज्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याच्या या संबंधित भागातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास उन्हाळी सुट्ट्यांमध्ये देखील अगदीच वेगवान होईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe